Solapur Crime: ‘छम छम’ च्या आड 'शेम शेम' प्रकार; बाहेरून कला केंद्र आत चालायचा वेश्या व्यवसाय

Solapur Crime: टेंभुर्णी पोलिसांनी मोडनिंब येथे सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. एका मोठ्या पोलिस कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Solapur Crime:
Tem bhurni police busted a prostitution racket operating under the name of a cultural centre in Modnimb,saam tv
Published On

कला केंद्राच्या नावाने सुरू असलेल्या वैश्या व्यवसायाचा पर्दापाश करीत टेंभुर्णी पोलिसांची मोठी कारवाई आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह ६ जणांना अटक केली आहे. तसेच २५ महिलांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्याचं मानली जात आहे. यात परराज्यातील महिलांचा समावेश आहे. दरम्यान पाच आरोपींना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Solapur Crime:
Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

ही कारवाई माढा तालुक्यातील मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रात करण्यात आली. टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन (भापोसे) अधिकारी राहुल आत्राम व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून समजलेली अधिक माहिती आधी की, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांना गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रातील मालक आणि मॅनेजर कामगार हे पर जिल्ह्यातील आणि दुसऱ्या राज्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करायला लावत.

या प्रकाराची पोलिसांनी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पंच, डमी ग्राहक यांच्यामार्फत नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला. मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्राचे मुख्य मालक, चालक, मॅनेजर व स्वागत लॉजचा मॅनेजर, रिक्षा चालक यांचा ही या गुन्ह्यात समावेश होता. पोलिसांना तब्बल २५ महिला मिळून आल्या.

Solapur Crime:
Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

यातील एका पीडित महिलेकडून हे आरोपी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करायला लावत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे या सर्वांच्याविरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल सहदेव देवकर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्यादी दिली. त्यानंतर सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कलाकेंद्र चालक १)जगन्नाथ तुकाराम घाडगे (रा.अरण,ता.माढा),

२)मॅनेजर विशाल लता पवार (वय-२४,रा.जामखेड ता.अहिल्यानगर), ३)बाळासाहेब गोविंद गिड्डे (वय ६३ वर्षे रा.अरण ता.माढा),

४) पार्टी मालकीन छाया बाळासाहेब सुरवसे (वय-३५ वर्षे रा.आंबेजोगाई जि.बीड),

५)रिक्षा चालक नितीन चांगदेव चव्हाण (वय ४९ वर्षे,रा.मोडनिंब ता.माढा), ६)स्वागत लॉज मॅनेंजर सिध्दांत सुखदेव गायकवाड (वय-३३ वर्षे रा.मोडनिंब ता.माढा) यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा करमाळा उपविभागाच्या अंजना कृष्णा व्ही एस, यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन (भापोसे),पोलीस अधिकारी तथा टेंभुर्णी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम,व पोसई सुनील सरडे,पोसई विलास रणदिवे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com