Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

Veen Doghantali Hi Tutena - Vat Purnima Special Song : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेला आता रोमँटिक वळण आले आहे. मालिकेत समर-स्वानंदी वटपौर्णिमा सण साजरा करताना दिसणार आहेत.
Veen Doghantali Hi Tutena - Vat Purnima Special Song
Veen Doghantali Hi Tutena VideoSAAM TV
Published On
Summary

'वीण दोघांतली ही तुटेना' वटपौर्णिमा विशेष भाग

समर-स्वानंदीमध्ये प्रेमाचे नातं बहरणार

समर-स्वानंदीचे वटपौर्णिमेला स्पेशल रोमँटिक गाणे रिलीज

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत गेलेकाही दिवस अंशुमनच्या लग्नामुळे हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मात्र आता पुन्हा एकदा मालिकेत प्रेमाचे वारे वाहताना दिसणार आहे. नुकताच झी मराठी वाहिनीने 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात वटपौर्णिमा स्पेशल भागाची झलक पाहायला मिळाली आहे. वटपौर्णिमा स्पेशल समर-स्वानंदीचे 'सात जन्मभर साथ जन्मभर ' हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात दोघेही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे.

वटपौर्णिमा स्पेशल गाण्याचे बोल असे आहेत की, "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..." व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, स्वानंदी लाल रंगाची साडी नेसून आरशासमोर बसून मराठमोळा साज श्रृंगार करत असते. स्वानंदी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तयार होत असते. ती खूप आनंदी आणि लाजताना दिसत आहे. स्वानंदीला लपून समर पाहत आहे. समरने देखील स्वानंदीला मॅचिंग लाल रंगाची शेरवानी परिधान केलेली असते. समर आपल्या बायकोला कॅमेरात टिपत आहे. त्यानंतर समर -स्वानंदीला सरप्राइज देतो. तो तिच्या पावलाचे ठसे घेतो आणि त्यांची फ्रेम बनवतो. घरातली एका भिंतीवर हार्ट शेपमध्ये सर्व फोटो समर लावतो आणि स्वानंदीला गोड सरप्राइज देतो, जे पाहून स्वानंदी खूपच खुश होते.

पुढे प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्वानंदी वटपौर्णिमेसाठी खास हातावर मेहंदी काढते त्यात लिहिलं असते की, 'Swanandi Love Samar...' त्यानंतर आपल्या मेहंदीची छाप ती समरच्या हातावरही काढते. त्यानंतर समर स्वानंदीसाठी पूजेचे ताट तयार करतो. दोघे देवाच्या पाया पडतात. समर प्रेमाने स्वानंदीची नजर काढतो, कारण तू खूपच सुंदर दिसत असते. त्यानंतर स्वानंदी वडाची पूजा करण्यासाठी झाडाजवळ जाते तर पाहते की, समर आधीच वडाच्या झाडाचे फेऱ्या मारत असतो. जे पाहून स्वानंदी भारावून जाते. स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येते. त्यानंतर दोघे मिळून वडाची पूजा करतात आणि वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारतात. देवाकडे साथ जन्माची साथ मागता. शेवटी दोघांचा रोमँटिक डान्स दाखवला आहे.

प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मैत्रीच्या नात्याने जुळलेली ही वीण आता प्रेमाच्या सुंदर नात्यात फुलणार...वटपौर्णिमेनिमित्त घेऊन आलो आहोत हा सुरेल नजराणा, नवीन गाणं - सात जन्मभर साथ जन्मभर" या प्रोमोला प्रेक्षकांन भरपूर प्रेम दिले आहे. प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते वटपौर्णिमा विशेष भागासाठी खूपच उत्सुक आहे. तसेच समर स्वानंदीच्या जोडीचे सर्वत्र कौतुक आहेत आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका दररोज संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.

Veen Doghantali Hi Tutena - Vat Purnima Special Song
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com