Veen Doghantali Hi Tutena :'वीण दोघांतली ही तुटेना' मध्ये धक्कादायक ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली एक्झिट, मालिका कोणते वळण घेणार?

Marathi Actress Exit Form Veen Doghantali Hi Tuten : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीने एक्झिट घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने याची माहिती दिली आहे.
Marathi Actress Exit Form Veen Doghantali Hi Tuten
Veen Doghantali Hi Tutena SAAM TV
Published On
Summary

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील अभिनेत्रीने एक्झिट घेतली.

मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली.

मालिकेत समर-स्वानंदीचे प्रेमाचे नाते फुलताना दिसत आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेतील समर-स्वानंदीची जोडी लोकांना खूप आवडते. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या केमिस्ट्रीचे सर्वत्र कौतुक होताना दिसते. अलिकडेच या मालिकेत 'कुलवधू' फेम अभिनेत्री पूर्वा गोखलेची एन्ट्री झाली आहे. तिने मालिकेत समरची जुनी मैत्रीण किमया हे पात्र साकारले आहे.

किमया समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात एक वादळ बनून येते. किमयाच्या येण्याने स्वानंदीला धक्का बसतो कारण किमया समरची एक्स गर्लफ्रेंड आणि जवळची मैत्रीण असते. किमया आल्यामुळे स्वानंदीला समरवरच्या प्रेमाची जाणीव होते आणि समरला देखील स्वानंदीची मैत्री आणि प्रेम समजते. मात्र आता किमया या पात्राची मालिकेतून एक्झिट होत आहे, म्हणजेच अभिनेत्री पूर्वा गोखलेने मालिकेला निरोप दिला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

पूर्वा गोखले पोस्ट

"किमाया...ती एखाद्या वादळासारखी आली आणि मग हळूच स्थिरावली. यावेळी मात्र प्रत्येकानेच या वादळाचा आणि त्यासोबत आलेल्या धामधुमीचा मनमुराद आनंद लुटला...अवघ्या १५ दिवसांच्या या 'अतिथी-भेटीने' माझ्यावर अमाप प्रेम, आदर, आपुलकी आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे... मी अत्यंत ऋणी आणि कृतज्ञ आहे..."

सुबोध भावे आणि पूर्वा गोखले 'कुलवधू' मालिकेत एकत्र काम केले आहे. पूर्वा गोखलेच्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळीं कमेंट्स करून तिच्यासाठीचे प्रेम व्यक्त केले आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' च्या टीमने सेटवर केक कापून पूर्वाला निरोप दिला. पूर्वा गोखलेने सेटवरील छान फोटो शेअर केले आहेत. आता किमाया नावाचे वादळ गेल्यानंतर समर-स्वानंदीचे नात कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Marathi Actress Exit Form Veen Doghantali Hi Tuten
Salman Khan Video : "60 साल का हो गया हूँ, लेकीन लडना नहीं भूला..."; सलमान खान कुणावर भडकला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com