Priya Marathe Death: 'तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं...'; जिव्हाळ्याची मैत्रीण गेल्यानं प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर

Prarthana Behere Post for Priya Marathe: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने आपल्या जिवलग मैत्रीण आणि सहकलाकार प्रिया मराठेच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
Prarthana Behere Post for Priya Marathe
Prarthana Behere Post for Priya MaratheSaam Tv
Published On

Prarthana Behere Post for Priya Marathe: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने आपल्या जिवलग मैत्रीण आणि सहकलाकार प्रिया मराठेच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. प्रार्थनाने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले की, ए वेडे प्रिया , पियू , परी , प्री , ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे ... आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्‌तास बोलत बसायचो…मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं.खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही.

प्रार्थना बेहेरे म्हणाली, ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण.तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं. अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी आणि वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख, तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला.ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला.

Prarthana Behere Post for Priya Marathe
Box Office: बॉक्स ऑफिसवर 'परम सुंदरी'ची जादू; 'कुली' आणि 'वॉर 2' ला टाकलं मागे, तिसऱ्या दिवशी कलेक्शन किती?

तिने पुढे लिहीले, कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की प्रियाची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती.मी, ती आणि शाल्मली आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे.ती खूप आनंदी होती…

Prarthana Behere Post for Priya Marathe
Priya Marathe Death: 'मला वडील नाहीत, माझे वडील बनाल...'; प्रिया मराठेसाठी विजू मानेंची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं,“तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.” कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे.माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे... कायमचा. असे ती शेवटी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com