Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनच्या लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Tharla Tar Mag Serial Promo:मराठी मालिकाविश्वातील 'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट सुरु आहेत. अर्जुन सायलीच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजेच त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आहे.
Tharla Tar Mag
Tharla Tar MagSaam Tv

मराठी मालिकाविश्वातील 'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट सुरु आहेत. अर्जुन सायलीच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजेच त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर ते दोघेही वेगळे होणार आहेत. परंतु दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे. एका गैरसमजामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. मालिकेच्या पुढच्या भागात सर्वजण सायली- अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत. याचाच प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मालिकेच्या प्रोमोत सायली-अर्जुनच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असतो. त्यासाठी सुभेदार कुटुंबियांनी बाहेर गार्डनमध्ये डेकोरेशन करुन सेलिब्रेशनचा प्लान केला आहे. यासाठी सर्वजण गार्डनमध्ये उपस्थित असतात. मग रात्री सायली अर्जुन गार्डनमध्ये येतात. घरच्यांनी केलेले सेलिब्रेशन पाहून ते दोघेही खूप भावू होतात. सायली अर्जुन केक कापायला पुढे जातात. तेव्हा त्यांना मनातील इच्छा बोलून दाखवायला सांगितले जाते. सायली मनात म्हणते की, ही माणसं आणि माझं पहिलं प्रेम विसरण्याची ताकद मला दे. तर अर्जुन म्हणतो की, मिसेस सायली कधीच मला सोडून जाऊ नये. ही इच्छा बोलताना दोघेही खूप जास्त भावूक होताना दिसत आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Tharla Tar Mag
Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

सायली अर्जुनचे नातं आता कोणतं नवं वळण घेणार आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. सायली-अर्जुन खरेच वेगळे होणार का? त्यांचा घटस्फोट होणार का? सायली अर्जुन प्रेमाची कबुली देणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे. मालिकेत येत्या काही दिवसात मधु भाऊंच्या केसचा निकाल लागणार आहे. यात साक्षी आणि महिपत दोषी ठरणार का? हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.

Tharla Tar Mag
Bade Miyan Chote Miyan Day 2 Collection: 'बडे मियाँ छोटे मियाँ'ने मारलं बॉक्स ऑफिसवरील 'मैदान'; लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com