Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Ashvini Mahangade Emotional Post : टेलिव्हिजन अभिनेत्री आश्विनी महांगडेने नुकतंच तिच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं....";  अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक
Ashvini Mahangade Emotional PostSaam Tv

टेलिव्हिजन अभिनेत्री आश्विनी महांगडे आपल्या वैविध्यपुर्ण अभिनयासाठी ओळखली जाते. 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई कुठे काय करते' या दोन मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. आश्विनी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्री नेहमीच आपल्या खासगी आयुष्यातील आठवणी शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्टची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं....";  अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक
Tiger Shroff : टायगर श्रॉफला मोठा झटका, 'बडे मियाँ छोटे मियाँ' फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांकडून फीसमध्ये कपात

आज आश्विनी महांगडेच्या वडिलांचे तृतीय पुण्यस्मरण आहे. अभिनेत्रीने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आश्विनी महांगडेने लिहिले की, "आज नानांचा तिसरा पुण्यस्मरणदीन... बघता बघता ३ वर्ष निघून गेली त्यांच्याशिवाय. बरेच आनंदाचे क्षण, दुःख, घेतलेल्या वस्तू, माझे पहिले घर हा सगळा त्यांच्याशिवाय करावा लागलेला प्रवास. पण या सगळ्यात माझ्या विचारात, माझ्यात ते कायम आहेत आणि राहतील. असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं. त्यांच्या शेवटच्या काही दिवसात त्यांनी आमच्यासाठी पाहिलेली स्वप्न मला सांगितली आणि ती मी नक्की पूर्ण करेन."

अभिनेत्रीने नुकतंच शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आश्विनी अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीही अभिनेत्रीने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली होती. त्यामध्ये तिने लाकूडतोड्याची म्हणजेच वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली होती. तिने लाकडीच्या वखारीवरील काही फोटो शेअर करत आपल्या वडिलांच्या काही आठवणींना उजाळा दिला.

Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं....";  अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक
Cannes Film Festival 2024 : मराठी सिनेमाचा फ्रान्समधील कान्स फेस्टिव्हलमध्ये डंका, सिद्धार्थ जाधवच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com