Cannes Film Festival 2024 : मराठी सिनेमाचा फ्रान्समधील कान्स फेस्टिव्हलमध्ये डंका, सिद्धार्थ जाधवच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग

Hazaar Vela Sholay Pahilela Manus Film : मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवच्या एका मराठी चित्रपटाची आता परदेशात स्क्रिनिंग होणार आहे.
Cannes Film Festival 2024 : मराठी सिनेमाचा फ्रान्समधील कान्स फेस्टिव्हलमध्ये डंका, सिद्धार्थ जाधवच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग
Hazaar Vela Sholay Pahilela Manus Film Screening At Cannes Festival 2024Saam Tv

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनय आणि जबरदस्त विनोदी शैलीच्या जोरावर मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सिद्धार्थ जाधवने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. खरंतर प्रत्येक कलाकार आपल्या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हावी, अशी मनात इच्छा बाळगतो. सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवच्या एका मराठी चित्रपटाची आता परदेशात स्क्रिनिंग होणार आहे.

Cannes Film Festival 2024 : मराठी सिनेमाचा फ्रान्समधील कान्स फेस्टिव्हलमध्ये डंका, सिद्धार्थ जाधवच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग
Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील अनेक चित्रपटांची स्क्रिनिंग होते. यामध्ये मराठी चित्रपटांचाही समावेश आहे. अद्याप सिद्धार्थ जाधव स्टारर 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' चित्रपट रिलीज झालेला नाही. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे कौतुक होत आहे. नुकतंच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना चित्रपटाबद्दल माहिती दिलेली आहे.

पोस्टमध्ये सिद्धार्थने लिहिलंय की,

"आपला मराठी सिनेमा CANNES फिल्म फेस्टिवलबद्दल खूप वेळा ऐकलं होतं, जेव्हा जेव्हा इथे आपला "मराठी सिनेमा" गेलाय तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा... CANNES फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे.... खूपच आनंद वाटतोय. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमे येतात आणि बघितले जातात... तिथे आपल्या मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग होत आहे याचा मला खूप आनंद आहे... " हजार वेळा शोले पाहिलेला माणूस..."च्या टीमचं खूप खूप मनापासून आभार खूप छान वाटतंय असंच प्रेम ठेवा... हा सिनेमा लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर व्हावा याची मी आतुरतेने वाट पाहतोय... लव यू.. थँक्यू ! "

Cannes Film Festival 2024 : मराठी सिनेमाचा फ्रान्समधील कान्स फेस्टिव्हलमध्ये डंका, सिद्धार्थ जाधवच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग
Sonalee Kulkarni : पत्रकार ते अभिनेत्री; सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

चित्रपटाचं गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई फेस्टिवल येथे चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. सिद्धार्थ जाधवचा हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये, १६ मे आणि १९ मे रोजी दाखवला जाणार आहे. सिद्धार्थच्या ह्या "हजार वेळा शोले पाहिलेला माणूस" चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थचा 'ये रे ये रे पैसा ३' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Cannes Film Festival 2024 : मराठी सिनेमाचा फ्रान्समधील कान्स फेस्टिव्हलमध्ये डंका, सिद्धार्थ जाधवच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग
Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com