Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Nayak 2 Confirmed : तब्बल २३ वर्षांनंतर 'नायक २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच निर्मात्यांनी चाहत्यांना चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे.
Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा
Anil Kapoor's Nayak Movie SequelSaam Tv

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटाची (Nayak Film) आजही प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. चित्रपटामध्ये अनिल कपूरने एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटाचा लवकरच सिक्वेल रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा होत आहे. तब्बल २३ वर्षांनंतर 'नायक २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच निर्मात्यांनी चाहत्यांना चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे.

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा
Sonalee Kulkarni : पत्रकार ते अभिनेत्री; सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

निर्मात्यांनी 'नायक २'वर काम करायला सुरुवात केल्याची माहिती एका मुलाखतीत दिली आहे. २३ वर्षांनंतर चित्रपटात राणी मुखर्जी आणि अनिल कपूर पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. मिड- डे ला दिलेल्या मुलाखतीत निर्माते दिपक मुकुट यांनी सांगितलं की, "आम्ही चित्रपटाचे राईट्स विकत घेतलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आम्ही चित्रपटावर काम करायला सुरूवात केली आहे. स्क्रिप्ट आणि स्क्रिन प्लेवर सध्या काम सुरू आहे. जसं कथानक पूर्ण होईल, तसं अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होईल." चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार ? अद्याप हे ठरलेलं नाही.

अनिल कपूर आणि राणी मुखर्जीच्या 'नायक' चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. 'नायक' चित्रपट सप्टेंबर २००१ मध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला होता. हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण जेव्हा त्याचा टेलिव्हिजन प्रीमियर झाला त्यावेळी हा चित्रपट हिट ठरला होता. त्याचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केले होते. तर ए.एम.रत्नम यांनी निर्मिती केली होती. पण आता दिपक मुकुटने चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून ते 'नायक २'ची निर्मिती करत आहे. 'नायक २' मध्ये चित्रपटात प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा
Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com