Sunny Deol : रणवीर सिंहनंतर सनी देओल गाजवणार बॉक्स ऑफिस, 'धुरंधर २' ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'हा' चित्रपट

Sunny Deol Upcoming Movie : बॉलिवूड अभिनेता सनी देओल लवकरच ॲक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धुरंधर २' नंतर बॉक्स ऑफिसवर फक्त सनी देओलची चर्चा पाहायला मिळेल.
Sunny Deol Upcoming Movie
Sunny Deolsaam tv
Published On
Summary

रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' ने जगभराला वेड लावले आहे.

सनी देओल लवकरच ॲक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सनी देओलच्या ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

जगभरात 'धुरंधर'ची चर्चा सुरू असताना आता बॉलिवूड हिरो सनी देओल आपला आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामुळे सनी देओल चांगलाच चर्चेत आहे. 'बॉर्डर २' नंतर सनी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 'धुरंधर २' च्या बॉक्स ऑफिसवरील यशाच्या पार्श्वभूमीवर सनीने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली आहे. 'गदर २', 'जाट' आणि 'बॉर्डर २' च्या प्रचंड यशानंतर सनी देओल एका मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सनी देओलने त्याचा आगामी चित्रपट अँटनी (Antony) च्या शूटिंगला सुरूवात केली आहे. सनी देओल सध्या 'अँटनी' या हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग मुंबईत झाले. आता गोव्यात शूटिंग होत आहे, ज्यासाठी सनी देओल आधीच गोव्याला रवाना झाला आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, 'अँटनी'चे चित्रीकरण गोव्यात सुमारे एक महिना चालणार आहे. बालाजी गणेश दिग्दर्शित 'अँटनी'मध्ये गोव्यातील फाईट सीन्स दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटात एका बीच फाईट सीनचा समावेश आहे. सनी देओल बहुतेक फाईट सीन्स करणार आहे.

'अँटनी' या चित्रपटाची कथा गोव्यातील एका गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची आहे. सनी देओल पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, तर विजय वर्मा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2027 ला रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे.

'अँटनी' व्यतिरिक्त सनी देओल बहुप्रतिक्षित 'रामायण' या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल तर दुसरा भाग २०२७च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. तसेच सनी देओलचा 'लाहौर १९४७' चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sunny Deol Upcoming Movie
Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com