Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Suraj Chavan Wife Pregnant : गुलीगत किंग सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पत्नी संजनाचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
Suraj Chavan Wife Pregnant
Suraj Chavansaam tv
Published On
Summary

सूरज चव्हणने नोव्हेंबर 2025 मध्ये लग्नगाठ बांधली.

सूरज चव्हण आता लवकरच बाबा होणार आहे.

सूरज चव्हणच्या बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल होत आहे.

'बिग बॉस मराठी'मुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला अभिनेता सूरज चव्हाण कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सूरजने 2025 मध्ये लग्नगाठ बांधली. त्याआधी सूरज 'झापुक झुपूक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. लग्नाआधी सूरज चव्हाणने आपल्या नवीन घरात प्रवेश केला. लग्नानंतर सूरज आता बायकोसोबत रोमँटिक रील बनवताना दिसतो. अशात आता सूरजच्या बायकोचे संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात संजना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ज्यामुळे सूरज चव्हाण लवकर बाबा होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सूरज चव्हाणची बायको संजनाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो (official_sanjana_suraj_1151) या अकाउंट वरून सोशल करण्यात आले आहे. फोटोमध्ये संजना पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने केशरी , हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे. तसेच तिने फुलांचे दागिने घातले आहेत. हातात फिरवा चुडा दिसत आहे. साडीत संजनाने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट केले आहे.

दुसऱ्या फोटोंमध्ये संजनाने सुंदर हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसली आहे. फुलांचे दागिन्यांमध्ये संजना खूप सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेगनेंसी ग्लो पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये रेड हॉर्ट, गरोदर स्त्रीचा इमोजी आणि नजरचा इमोजी दिसत आहे. या फोटोंमुळे संजना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेचे सूरज चव्हाण लवकर बाबा होणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप सूरज चव्हाणने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. चाहते या दोघांना शुभेच्छा देताना दिसत आहे.

सूरज चव्हण 29 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकला. सूरजने चुलत मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे , लग्नानंतरच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.'बिग बॉस मराठी 5'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. लग्न सोहळ्यात हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व समारंभ थाटामाटात पार पडले आहे. सूरज चव्हाणच्या लग्नात बिग बॉसची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर दिसली. तिने संपूर्ण लग्न सोहळ्यात सूरज चव्हाणची साथ दिली. जान्हवी सूरजला आपला भाऊ मानते.

Suraj Chavan Wife Pregnant
Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर २' ची यशस्वी घोडदौड, सलग तिसऱ्या सोमवारी छप्परफाड कमाई; वर्ल्डवाइड कलेक्शन 1,600 कोटींपार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com