Suraj Chavan : सूरज चव्हाण भारतातील सर्वात हँडसम तरूण? वाचा नेमकं सत्य काय

Suraj Chavan-India Most Handsome Man : 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणला 'भारतातील सर्वात हँडसम तरूण' म्हटले जात आहे. नेमकं सत्य काय, जाणून घेऊयात.
Suraj Chavan-India Most Handsome Man
Suraj Chavansaam tv
Published On
Summary

सूरज चव्हाणला 'भारताचा सर्वात हँडसम पुरुष' म्हटले जात आहे.

सूरजला 'भारताचा जस्टिन बीबर' असेही बोले जात आहे.

सूरज चव्हाणला 'बिग बॉस मराठी 5'मुळे खूप लोकप्रियता मिळाली.

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याला बिग बॉसमुळे खूप लोकप्रियता मिळाली. छोट्याशा गावातून आलेला सूरज आता अवघ्या महाराष्ट्राचा लाडका झाला आहे. यूके आणि यूएसमधील टॅब्लॉइड्सनी सूरज चव्हाणला भारतातील 'भारताचा सर्वात हँडसम पुरुष' म्हणून त्याला 'भारताचा जस्टिन बीबर' म्हटले जाऊ लागले. यामुळे एकीकडे सूरजच्या चाहत्यांना आनंद देखील झाला. तर दुसरीकडे सुरजला ट्रोल देखील करण्यात आले.

सूरज चव्हाण आपल्या हेअर स्टाइलमुळे चर्चेत आला आहे. गुलीगत किंग सूरज चव्हाणच्या हेअर स्टाइलची तुलना कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबर यांच्यासोबत करण्यात आली आहे. सूरज चव्हाणचे केस कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील (सुमारे 2010) लूकसारखेच आहेत. परदेशी वापरकर्ते त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि त्याच्या लूकची तुलना त्या काळातील जस्टिन बीबरच्या लूकशी करत आहेत. या तुलनेवर लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचे फोटो जागतिक स्तरावर व्हायरल होत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, ही सर्व चर्चा फक्त एका सोशल मिडिया पोस्टमुळे सुरू झाली आहे. यासंबंधित कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती समोर आली नाही. हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. सूरज चव्हाण हा त्यांच्या कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याला अधिकृतपणे अशी कोणतीही पदवी मिळालेली नाही.

सूरज चव्हाण कोण?

सूरज चव्हाण बारामती येथे राहणारा मुलगा आहे. 2025 मध्ये सूरज चव्हाण आपल्या चुलत मामाच्या लेकीसोबत लग्न बंधनात अडकला. तसेच 2025 च्या शेवटी तो आपल्या नवीन घरात देखील गेला. तो एक सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहे. तसेच प्रसिद्ध रील स्टार आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Suraj Chavan-India Most Handsome Man
Bigg Boss Marathi 6 : ओमकार राऊतने बिग बॉसच्या घराला केले टाटा, बाय बाय; शक्ती अन् युक्ती दोन्ही पडली कमी, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com