Bigg Boss Marathi 6 : ओमकार राऊतने बिग बॉसच्या घराला केले टाटा, बाय बाय; शक्ती अन् युक्ती दोन्ही पडली कमी, पाहा VIDEO

Omkar Raut Exit From Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'मधून चौथ्या आठवड्यात ओमकार राऊत बाहेर पडला आहे. त्याचा प्रवास जाणून घेऊयात.
Omkar Raut Exit From Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाली आहे.

चौथ्या आठवड्यात ओमकार राऊतने घराचा निरोप घेतला आहे.

घराबाहेर जाताना ओमकार राऊत खूपच भावुक झाला.

'बिग बॉस मराठी 6' चा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. चौथ्या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आयुष संजीव, सचिन कुमावत, दिपाली सय्यद, ओमकार राऊत, दिव्या शिंदे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राकेश बापट आणि प्रभू शेळके यांचा समावेश होता. चौथ्या आठवड्यात घरातून दोन सदस्य नॉमिनेट झाले. घरातील सदस्यांना धमकी दिल्यामुळे दिव्या शिंदेला घरातून बाहेर काढण्यात आले. तर चौथ्या आठवड्यात कमी मत मिळाल्यामुळे ओमकार राऊतला घराचा निरोप घ्यावा लागला.

ओमकार राऊत कोण?

'बिग बॉस मराठी 6'च्या घरात ओमकार राऊत आणि विशाल कोटियनने एकत्र एन्ट्री घेतली होती. 'मेहनतीचं दार' निवडून ओमकार राऊतने घरात प्रवेश केला होता. ओमकार राऊत हा उत्तम हेअर स्टायलिस्ट आहे. तो एक फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखला जातो. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने ओमकार राऊतला आपल्या गेममध्ये सुधारणा करायला सांगितले होते. मात्र त्याचा गेम प्रेक्षकांपर्यंत पोहचला नाही किंवा तो जास्त सक्रिय वाटला नाही. त्यामुळे त्याला कमी मते मिळाली.

ओमकार राऊत बाहेर जाताना त्याला त्याच्या प्रवासाची सुंदर व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. जी पाहून ओमकार खूपच भावुक झाला. शो मधून जाताना ओमकार राऊत रितेश भाऊंना म्हणाला की, "माझा प्रवास छोटा असला तरी सर्वांसोबत या घरात राहून खूप छान वाटले. मला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटता आले. व्हिडीओ क्लिप पाहून सगळ्या आठवणी आणि माझा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला..."

राखी सावंतची एन्ट्री

बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीनची एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस मराठी 6'ची पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची शोमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे. राखी सावंत बिग बॉसच्या घरात नागिन अवतारात येते. तिला पाहून घरातील सदस्य खूपच खुश आणि आनंदी होतात. मात्र घरात येता क्षणी राखी तन्वी कोलतेला चांगलीच टार्गेट करते. राखी म्हणते की, "तन्वी कोलते आता मी तुला मस्त सोलते..." बिग बॉसच्या घरात येताच राखी सावंतने तन्वी कोलतेशी पंगा घेतला आहे.

Omkar Raut Exit From Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 : गेम पलटला; बिग बॉसच्या घरात राखी सावंतची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com