Bigg Boss Marathi 6 : गळा दाबला अन्...; बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीची झुंज, विशाल-ओमकार एकमेकांना भिडले, पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 Captaincy Task : बिग बॉसच्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. टास्क दरम्यान विशाल आणि ओमकार यांच्यात हाणामारी होताना दिसत आहे.
Bigg Boss Marathi 6  Captaincy Task
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरातून 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

नॉमिनेशन टास्कनंतर घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला.

कॅप्टन्सी टास्कमध्ये विशाल आणि ओमकार यांच्यात हातापायी होते.

बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आहे. त्यानंतर घरात कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. यात सदस्यांमध्ये तुफान राडा होताना पाहायला मिळाला. विशाल आणि ओमकार एकमेकांना मारताना दिसत आहे. बिग बॉसच्या सुरुवातीलाच घरात शाररिक हिंसा पाहायला मिळत आहे. ज्यामुळे प्रेक्षकही चिडले आहेत. कॅप्टन्सी टास्क दरम्यान नेमकं काय होते, जाणून घेऊयात.

शॉर्टकट दार आणि मेहनतीचे दार प्रत्येक टास्कमध्ये एक वेगळी रंगत घेऊन येत आहे. शॉर्टकट दार ज्यांनी निवडे त्यांना पॉवर Key देण्यात आली. एकूण 6 सदस्यांना पॉवर Key मिळाली. पॉवर Key मिळालेल्या सदस्यांना जोडीने वर चेंबरमध्ये बोलावले. सोनाली-रुचिता, करण-प्राजक्ता, दिपाली-तन्वी अशा जोड्या बनवल्या. रुचिता आपली पॉवर Key गमवते. तिची पॉवर Key करण घेतो. त्यामुळे ती नॉमिनेट होते. दिपाली-तन्वीमध्ये तन्वी पहिला बझर वाजवून कॅप्टन पदाची उमेदवार बनते. त्यानंतर सोनाली उमेदवार बनते. तर करण-प्राजक्तामध्ये प्राजक्ता कॅप्टन पदाची दावेदार होते. आता तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता यांच्यात कॅप्टन्सी टास्क रंगतो.

बिग बॉसच्या घरात 'BB फार्म' नावाचा कॅप्टन्सी टास्क होतो. या तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता यांना त्याचे समर्थक टास्कमध्ये मदत करताना दिसले. मात्र टास्क दरम्यान विशाल आणि ओमकारमध्ये हाणामारी झाली. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विशाल ओमकारच्या हातातील वस्तू घेण्यासाठी त्याला ढकलतो. विशाल ओमकारचा गळा पकडतो. तेव्हा ओमकार गळा सोड असे ओरडताना दिसतो. त्यानंतर दोघे पुन्हा भांडू लागतात. दोघांमध्ये भांडणासोबतच शाररिक शक्तीचा वापर केल्याचे दिसून आले. घरातील इतर सदस्य भांडण सोडवताना दिसले.

नॉमिनेशच्या पतंग कापण्याच्या टास्कमध्ये एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेट सदस्यांची यादी खालील प्रमाणे-

  • दिपाली सय्यद

  • करण सोनवणे

  • रुचिता जामदार

  • प्रभू शेळके

  • अनुश्री माने

  • सागर कारंडे

  • दिव्या शिंदे

  • रोशन भजनकर

  • राधा पाटील

'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे. अद्याप कॅप्टन्सीच्या विजेत्याचे नाव समोर आले नाही. पहिलाचा भाऊचा धक्का प्रचंड गाजणार असल्याचे दिसत आहे. रितेश भाऊ आणि बिग बॉस विशाल आणि ओमकारला काय शिक्षा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

Bigg Boss Marathi 6  Captaincy Task
Shashank Ketkar : "ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या बाहेर 'ही' अवस्था..."; शशांक केतकर चिडला, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com