Bigg Boss Marathi 6 : "Captain नाही winner आहेस तू..."; प्रेक्षकांनी ठरवला 'बिग बॉस मराठी ६' चा विजेता, 'तो' सदस्य घर गाजवणार

Bigg Boss Marathi 6 Update : बिग बॉसच्या घरातील ड्रामा प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. प्रेक्षकांनी घरातील एका सदस्याला विजेता घोषित केले आहे. 'तो' सदस्य कोण, जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून भांडणे पाहायला मिळत आहे.

बिग बॉसला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

घरात राकेश बापट आणि विशाल कोटियनचे दणक्यात भांडण झाले.

बिग बॉसचा खेळ आता चांगलाच रंगताना दिसत आहे. रोज नवीन ड्रामा होताना दिसत आहे. या वेळेचे स्पर्धक एकमेकांशी तुफान भिडताना दिसत आहेत. या सीझनमध्ये हिंदी 'बिग बॉस 15' गाजवणारा राकेश बापट झळकला आहे. अलिकडेच तो 'नवरी मिळे हिटलरला' या कार्यक्रमात पाहायला मिळाला. मालिकेतील त्याची एजे ची भूमिका खूप गाजली.

बिग बॉसच्या घरात आता एजे आपला स्वॅग दाखवताना दिसत आहे. घरात राकेश बापट आणि विशाल कोटियनचे दणक्यात भांडण झाले आहे. राकेश आता आपला गेम दाखवायला लागला आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किचन एरियात सर्वजण काम करत असतात. तेव्हा राकेश आणि विशाल यांच्यात भांडणे होतात. दोघांमध्ये संभाषण असे की -

राकेश बापट - "ज्यांचे टॉवेल्स आहेत ना आतमध्ये त्यांनी धुवायचे असतील तर इथे टाकून घ्या..."

विशाल कोटियन - "आम्ही काय केलं पाहिजे हे तू आम्हाला सांगू नकोस...तू कॅप्टन नाहीयेस अजून..."

एका टॉवेल वरून दोघे भांडू लागतात. तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पडत आहे. प्रेक्षकांना राकेश बापटचा अंदाज खूप आवडला आहे. राकेश बापटला काही लोक 'बिग बॉस मराठी 6' विजेता बोलत आहे. "Captain नाही winner आहे राकेश बापट...", "Winner wibe राकेश भाऊ...विजेता", "फक्त किंग, आमचा हिरो..."," कोण म्हणतेय कॅप्टन आहे, RB विजेता आहे..." अशा कमेंट्स व्हिडीओवर पाहायला मिळत आहे. तसेच बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

बिग बॉसच्या घरात आता नवीन कोणता ड्रामा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.तसेच येणाऱ्या भागांमध्ये मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद भावुक होताना दिसणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा सीझन 100 दिवसांचा असणार आहे. यंदाची थीम 'दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार...' आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6 : भांड्यांचा ढिगारा पाहून स्पर्धक चक्रावले; टास्कदरम्यान 'ही' सदस्य बेशुद्ध पडली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com