बिग बॉसच्या घरात राशन टास्क पार पडला.
राशन टास्क दरम्यान घरातील एक सदस्य बेशुद्ध पडला.
घरात दिपाली सय्यद आणि राधा पाटील यांच्यात वाद झाला.
बिग बॉसच्या घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. पहिल्याच दिवशी घराचे दार बंद करून बिग बॉसने सदस्यांना बाहेर काढले. त्यानंतर तन्वी- रुचिता, विशाल-प्रभू यांच्यात भांडणे झाली आणि आता बिग बॉसच्या घरात पहिला राशन टास्क रंगणार आहे. ज्याचा प्रोमो समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल.
बिग बॉसच्या घरात स्पर्धक 'मिशन राशन' पार पाडताना दिसणार आहे. हा घरातील सर्वात महत्त्वाचा टास्क आहे. बिग बॉसच्या घरात 'मेहनतीचा दरवाजा' निवडून आलेले सदस्य हा टास्क करतात. यात सदस्य स्टोअर रूममधून भांडी आणताना दिसत आहेत. तर प्रभू शेळके स्विमिंग पूलमधून पाणी काढताना दिसतोय. एकंदर हा भांडी घासण्याचा हा टास्क दिसत आहे.
प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिव्या शिंदे म्हणते की, "अख्ख्या जिल्ह्याची भांडी दिलीत का घासायला... " त्यानंतर ती धावत गार्डनर एरियात येते आणि बेशुद्ध होऊन खाली पडते. तेव्हा घरातील एक सदस्य "प्लीज... डॉक्टर पाठवा बिग बॉस" असं म्हणतो. आता राशन टास्क कसा पूर्ण होतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. दिव्याची अवस्था पाहून सर्व सदस्यांना चांगलाच धक्का बसला.
'बिग बॉस मराठी ६' हा सीझन 100 दिवसांचा असणार आहे. यंदाची थीम 'दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार...' आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे. आता बिग बॉसच्या घरात नवीन कोणता ड्रामा होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.