माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Former Vice President Jagdeep Dhankhar Hospitalised At AIIMS: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Former Vice President Jagdeep Dhankhar admitted to AIIMS Delhi after a health emergency.
Former Vice President Jagdeep Dhankhar admitted to AIIMS Delhi after a health emergency.Saam Tv
Published On

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना दिल्ली येथील AIIMS हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. 10 जानेवारीला धनखड हे बाथरूममध्ये दोनवेळा बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्यान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की,धनखड यांचे वय आता 74 आहे. त्यांचा एमआरए करण्यात आला आणि मंगळवारी आणखी काही टेस्ट केल्या जातील.

Former Vice President Jagdeep Dhankhar admitted to AIIMS Delhi after a health emergency.
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन नियम करणार लागू

ते म्हणाले की, माजी राष्ट्रपतीना 10 जानेवारीला पहाटेच्या सुमारास 3.30 वाजता बाथरूममध्ये दोन वेळा बेशुद्ध झाले. ज्यावेळी ते उपराष्ट्रीपदावर होते त्यावेळी कच्छच्या रण, उत्तराखंड, केरळमध्ये आणि दिल्लीमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असताना त्यावेळी देखील ते बेशुद्ध पडले होते.

Former Vice President Jagdeep Dhankhar admitted to AIIMS Delhi after a health emergency.
अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड

प्रकृतीच्या कारणास्तव दिला होता राजीनामा

धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 11 ऑगस्ट 2022 रोजी पदभार स्वीकारला आणि त्यांचा पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ 11 ऑगस्ट 2027 रोजी संपणार होता. त्यांचा जवळपास 2 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक होता. त्यांनी अचानक राजीनामा सुपूर्द केला होता यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली होती.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते राज्यसभेचे कामकाज बघत होते आणि त्याच रात्री त्यांनी राजीनामा दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. उपराष्ट्रपतीपद सोडल्यापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये अनेकवेळा बिघाड झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गेल्या वर्षीच त्यांना हृदयविकारामुळे AIIMS मध्ये दाखल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com