Ambernath politics
AmbernathSaam tv

अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड

ambernath political news : अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी खेळलीये. अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड झालीये.
Published on
Summary

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड

अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाने मारली बाजी

अंबरनाथमध्ये शिंदे गटाचा भाजपला जोरदार धक्का

अजय दुधाणे, साम टीव्ही

अंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसांत राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपचाच वरचष्मा राहणार असल्याची चर्चा होती. परंतु मागील दोन दिवसांत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने डाव फिरवला. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. या खेळीची राज्यभर चर्चा होत आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड झाली. भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीला 28 मते मिळाली. तर अंबरनाथ शिवसेना महायुती विकास आघाडीला एकूण 32 मते मिळाली. या निवडीनंतर विरोधकांनी सदा मामा पाटील यांच्या विरोध घोषणा दिल्या.

अंबरनाथमध्ये काय राजकारण घडलं होतं?

भाजपने काँग्रेसचे नगरसेवक फोडून शिंदे गटाला धक्का दिला होता. मात्र, शिंदे गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सत्ता स्थापणेसाठी हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवार गटाचे सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.

Ambernath politics
तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

काँग्रेस फुटीर नगरसेवकांसोबत सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला खासदार श्रीकांत शिंदे यांनी धक्का दिला. या नगरपरिषदेत सेनेचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना आता अजित पवार गटाच्या ४ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. या खेळीने शिंदे गटाने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आहे.

Ambernath politics
राजकारण तापलं; वंचितच्या रॅलीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न, सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप, VIDEO

अंबरनाथमध्ये भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले होते. तर शिंदे गटाचे २७ नगरसेवक निवडून आले होते. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसशी आघाडी केली. टीका झाल्यानंतर भाजपने थेट काँग्रेसचे नगरसेवक फोडले. त्यानंतर आज झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com