तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...असाच एक व्हायरल व्हिडिओ आमच्या हाती लागलाय...या व्हिडिओत दावा करण्यात आलाय की आता ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांवर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
fact check
viral video Saam tv
Published On

आता तुम्ही करत असलेल्या ऑनलाईन शॉपिंगवरही आयकर विभागाची नजर राहणार आहे...असा दावा करण्यात आलाय...याच दाव्यामुळे एकच खळबळ उडालीय...घराघरात ऑनलाईन शॉपिंग केली जाते...जे आवडेल तर लगेच घरबसल्या मागवलं जातं...काही मिनिटात घरबसल्या मिळतं...यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...किती शॉपिंग केल्याने कारवाई होते...? आयकर विभागाचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...

सध्या बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग करतात...किराणाही आता लोक घरबसल्या मागवतात...त्यामुळे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं गरजेचं आहे...याची खरी माहिती काय आहे हे सांगण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती आयकर विभागाकडूनच मिळू शकते...त्यासाठी आमच्या टीमने काही अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली...खरंच आता आयकर विभाग ऑनलाईन शॉपिंगवर लक्ष ठेवतं का हे जाणून घेतलं...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

fact check
प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घेतला जगाचा निरोप; सिनेसृष्टीत शोककळा

साम इन्व्हिस्टिगेशन

आयकर विभाग ऑनलाईन शॉपिंगवर लक्ष ठेवत नाही

डिजिटल पेमेंट, अॅप व्यवहाराचा मागोवा घेत नाही

वैयक्तिक देखरेखीसाठी आयकरकडे यंत्रणा नाही

व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा

fact check
एक दिवस हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल; खासदार औवेसींचा दावा

बँका, निबंधक आणि इतर नियुक्त संस्था नियमित अनुपालन प्रक्रियेचा भाग म्हणून काही उच्च-मूल्याच्या व्यवहारांबद्दल मर्यादित माहितीच शेअर करतात...सर्वच ऑनलाईन शॉपिंगवर आयकर विभाग लक्ष ठेवत नाही...कारण, आता बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग करत असल्याने दिशाभूल करणारा दावा करण्यात आला...मात्र, आमच्या पडताळणीत तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर असते हा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com