प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घेतला जगाचा निरोप; सिनेसृष्टीत शोककळा

shukla kumar death : प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी शुक्ला कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
shukla kumar death
shukla kumar death Saam tv
Published On
Summary

शुक्ला कुमार यांच्या निधनाने सिनेृष्टीत शोककळा

शुक्ला कुमार या राजेंद्र कुमार यांच्या पत्नी होत

त्यांना अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

Shukla Kumar Death News: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी शुक्ला कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. शुक्ला कुमार यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शुक्ला कुमार यांनी निधनानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहत आहेत.

शुक्ला कुमार सिनेसृष्टीत त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जायच्या. राजेंद्र कुमार यांनी पडद्यावरील अभिनयाने लाखो लोकांचं मन जिंकलं होतं. दुसरीकडे शुक्ला या नेहमी लाइमलाइटपासून दूर राहायच्या. राजेंद्र कुमार सिनेसृष्टीत आघाडीवर काम करत असताना शुक्ला यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत कुटुंबाचा सांभाळ केला. राजेंद्र कुमार यांच्या करिअरच्या चढउताराच्या कठीण काळात त्यांनी साथ दिली.

shukla kumar death
Ladki Bahin Yojana : 3 हजारांच्या ऐवजी १५०० रुपये मिळाले, आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

मीडिया रिपोर्टनुसार, शुक्ला कुमार या रमेश बहेल आणि श्याम बहेल यांच्या बहीण होत्या. राजेंद्र कुमार आणि शुक्ला यांना ३ मुले होती. त्यांना १ मुलगा आणि २ मुली होत्या. शुक्ला कुमार यांचा मुलगा कुमार गौरव यांचं नाव देखील बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींच्या यादीत घेतलं जातं. कुमार गौरव यांनी अभिनेता संजय दत्तची सख्खी बहीण नम्रता दत्तशी लग्न केलं होतं.

shukla kumar death
मारहाण आणि हल्ला प्रकरणात जलील यांनी घेतलं भाजप अन् शिंदेंच्या नेत्याचं नाव

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्ला कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शोक सभेचा कार्यक्रम हा १० जानेवारी रोजी होईल. या सबेत सिनेसृष्टीतील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

shukla kumar death
दादांना घेरण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? भाजपच्या 'मिशन 100' ला 'दादां'चे आव्हान

शुक्ला कुमार यांचे पती राजेंद्र कुमार यांचं नाव दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत घेतलं जातं. त्यांचं निधन ३५ वर्षांपूर्वी १२ जुलै १९९१ साली झालं. राजेंद्र कुमार यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. राजेंद्र कुमार हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते कर्करोगाशी देखील झुंज देत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com