दादांना घेरण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? भाजपच्या 'मिशन 100' ला 'दादां'चे आव्हान

BJP Pune : पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेरण्यासाठी भाजपनं मास्टरप्लॅन आखलाय... पुण्यात अजित पवारांमुळे भाजपपुढे कसं आव्हानं उभं राहिलयं...फडणवीसांनी अजित पवारांना रोखण्यासाठी पदाधिकाऱ्यांना काय आदेश दिलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
devendra fadnavis news
ajit pawar newssaamtv
Published On

पुणे महापालिकेत शंभरहून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलेल्या भाजपसमोर आता मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचंच मोठं आव्हानं असणार आहे...अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेत... महापालिकेच्या मैदानात खेळलेल्या नव्या रणनीतीमुळे भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढलीय...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपमधील बंडखोरांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानं अनेक प्रभागांमध्ये मतविभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही खाजगी सर्वेक्षणातून पुण्यात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याची चर्चा आहे..

devendra fadnavis news
२० बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची झाली बदली? यादी समोर

दरम्यान पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपनं कोणता मास्टरप्लॅन आखलाय... पाहूयात...

पुण्यात भाजपनं 165 जागांचा सखोल आढावा घेण्याचं आणि ज्या प्रभागांमध्ये भाजपची ताकद कमी आहे, तिथे नवी रणनीती आखण्याचे निर्देश फडणवीसांनी दिलेत.त्यातच “गाफील राहू नका, कोणत्याही परिस्थितीत विजयाचा आकडा गाठलाच पाहिजे,” अशा कडक शब्दांत स्थानिक नेतृत्वाला फडणवीसांनी इशाराही दिलाय...त्यामुळे निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना पुण्यात भाजप आक्रमक भूमिका मांडण्याची चिन्ह आहेत...

devendra fadnavis news
Pune Shocking : पुण्यात खळबळ; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लॉजमध्ये केली आत्महत्या

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका दोन्ही राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ठरतेय..अशातच भाजपच्या प्रचारात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच जेवढं मागे जाऊ तेवढा वाद वाढेल, असं इशारा दिल्यानं पुणे महापालिकेची निवडणुक प्रतिष्ठेची झालीय... आता पुणे आणि पिंपरीत कोणाचा महापौर बसणार? अजित पवारांना रोखणं भाजपला शक्य होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com