२० बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची झाली बदली? यादी समोर

ips transfer : उत्तर प्रदेशमध्ये २० बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. कुणाची बदली झाली, जाणून घ्या.
IPS Transfer
IPSSaam tv
Published On
Summary

पोलीस विभागात मोठा फेरबदल झालाय

२० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात

यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचीही समावेश

उत्तर प्रदेशच्या पोलीस विभागात मोठा फेरबदल आहे. उत्तर प्रदेश विभागातील २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये डॉक्टर संजीव गुप्ता, राजेश डी राव यांच्या नावाचा समावेश आहे.

कुणाची झाली बदली?

उत्तर प्रदेशच्या पोलीस विभागातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. राम कुमार, राजकुमार, ज्योती नारायण, डॉ. संजीव गुप्ता, प्रशांत कुमार, तरुण गाबा, आशुतोष कुमार, अपर्णा कुमार, मोदक राजेश डी राव आणि आरके भारद्वाज यांच्या नावाचा समावेश आहे.

IPS Transfer
महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न; काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा जोरदार घणाघात

या व्यक्तिरिक्त किरण एस, आनंद सुरेश कुलकर्णी, अमित वर्मा,अखिलेश कुमार निगम, एन कोलान्ची, राजीव मल्होत्रा, रोहन पी कनय, मो. इमरान, संतोष कुमार मिश्रा, विजय ढुल यांच्याही नावाचा समावेश आहे.

IPS Transfer
पुणे आणि पिंपरीचा 'दादा' कोण? महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी, VIDEO

८ आयएस अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यांपूर्वी बदल्या

उत्तर प्रदेशमध्ये ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यावेळी सेल्वा कुमारी जे हे नियोजन विभागाच्या सचिव होते. त्यांची तांत्रिक शिक्षणाच्या महासंचालकपदी आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. समीर वर्मा यांचं नियोजन विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आयएएस अधिकारी प्रभु नारायण सिंह यांना उत्तर प्रदेशच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

IPS Transfer
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; छत्रपती शिवरायांना गुजरातला पळवण्याचा डाव, VIDEO

यावेळी मासूम अली सरवर, आशीष कुमार, सुधीर कुमार, अर्पित उपाध्याय, अंजुलता यांची देखील बदली करण्यात आली होती. उत्तप प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com