पुणे आणि पिंपरीचा 'दादा' कोण? महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी, VIDEO

Pune Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीत मित्रपक्षांमध्येच कशी वादाची ठिणगी पडलीय?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
pune political news
ajit pawar and devendra fadnavis Saam tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपलीय... गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत... अशातच अजित पवारांनी भाजपवर पुणे महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दादांवर जोरदार हल्लाबोल केलाय...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं महायुतीत आधीच वादाची ठिणगी पडली होती... अशातच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये किती जागांवर थेट लढत होणार आहे? पाहूयात...

पुणे महापालिका

राष्ट्रवादी काँग्रेस (AP)

विरुद्ध

भाजप

105

पिंपरी-चिंचवड महापालिका

राष्ट्रवादी काँग्रेस (AP)

विरुद्ध

भाजप

110

pune political news
भाजपमध्ये जाणार का? प्रणिती शिंदे यांनी मोजक्या शब्दात सांगितलं, चर्चांना उधाण

दरम्यान 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षीय बलाबल कसं होतं ते ही पाहूयात...

पुणे महापालिकेत भाजपचे 97, संयुक्त राष्ट्रवादीचे 39, संयुक्त शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, तर मनसेचे 2 नगरसेवक निवडून आले होते... तर पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे 77, संयुक्त राष्ट्रवादीचे 36, संयुक्त शिवसेनेचे 9 तर मनसेचा 1 नगरसेवक निवडून आला होता.

pune political news
Wednesday Horoscope : मानसिक ताण वाढणार, अपशब्द वापरणे टाळावे; ५ राशींच्या लोकांनी पार्टनरला चुकूनही दुखवू नका

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत याआधी भाजपचं वर्चस्व राहिलयं... त्यामुळे या दोन्ही महापालिका भाजप आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतेय... अशातच महायुतीतील मित्रपक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी एकमेंकांविरोधात शड्डू ठोकल्यानं महापालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे...मात्र हा वाद महापालिका निवडणुकीपर्यंतच मर्यादीत राहणार की याचे महायुतीतल्या संबंधांवरही परिणाम होणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com