भाजपमध्ये जाणार का? प्रणिती शिंदे यांनी मोजक्या शब्दात सांगितलं, चर्चांना उधाण

praniti shinde news : खासदार प्रणिती शिंदे यांनी सुजात आंबेडकर यांच्यावर दाव्यावर मोठं भाष्य केलंय. आंबेडकरांच्या सोलापुरातील दाव्यावर सोशल मीडियावर पोस्ट करून भाष्य केलं आहे.
praniti shinde
praniti shinde newsSaam tv
Published On
Summary

सुजात आंबेडकरांच्या दाव्यावर प्रणिती शिंदे यांचं प्रत्युत्तर

प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केलं भाष्य

प्रणिती शिंदे यांनी दावा फेटाळला

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या सोलापूरमधील वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं आहे. प्रणिती शिंदे लवकरच भाजपमध्ये जातील, असा दावा सुजात आंबेडकर यांनी केला होता. सुजात आंबेडकर यांच्या दाव्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

praniti shinde
महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात देहविक्रीचं रॅकेट; ४ तरुणींसोबत ५ तरुण आढळले नको त्या अवस्थेत

प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुजात आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिलं. इंस्टाग्रामवर स्टोरी लिहित काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी आंबेडकरांचा दावा फेटाळूना लावला आहे. ‘जनमाणसात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य विरोधकांना मदत करतात, याचे भान मित्रपक्षाने ठेवावे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

praniti shinde
भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवा; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, 'साधारणपणे अशा विधानांना मी उत्तर देत नसते. पण महापालिका निवडणुकींना सामोरे जाताना अशी विधान जनमाणसात संभ्रम निर्माण करतात. याचे भान प्रत्येक मित्र पक्षाने ठेवावे. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत देखील अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या. या अफवांना बळी पडू नका आणि संविधानाच्या उरावर बसू पाहणाऱ्या धूर्त शत्रूशी आपला लढा आहे. अशी बेलगाम विधान करून आपली लढाई कमकुवत करू नका. होच माझी त्यांना विनंती आहे'.

praniti shinde
एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडेल; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सुजात आंबेडकर काय म्हणाले होते?

सोलापुरातून वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार आहेत. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डिल झाल्याचा दावा सुजात आंबेडकरांनी केला होता. आपल्या विरोधात भाजप आहे. आरएसएस जरी निवडणूक लढवत असती तर त्यांना तिकडेही हरवलं असतं. आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला ही भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहिती आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com