Wednesday Horoscope : मानसिक ताण वाढणार, अपशब्द वापरणे टाळावे; ५ राशींच्या लोकांनी पार्टनरला चुकूनही दुखवू नका

Wednesday Horoscope : काही राशींच्या लोकांचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. तर काहींना अपशब्द वापरणे टाळावे लागतील.
Horoscope
Horoscope in Marathi Saam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक, मोबाईल नंबर - 9860187085

आजचे राशीभविष्य, ७ जानेवारी २०२६

मेष - मित्रांचा विश्वासू सल्लागार म्हणून काम करावे लागेल. नवीन कार्य सूरु करण्यास उत्तम दिवस असेल.

वृषभ - तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. मित्रांशी बोलताना तोंडातून अपशब्द वापरणे टाळावे, जेणेकरून वाद टाळता येईल.

मिथुन - गुळ आणि धने खाऊन घराबाहेर पडावे, जेणेकरून कमरेखालचे अवयव दुखणार नाहीत. मंदिराबाहेर लोकांना गोड पदार्थ दान करावा.

Horoscope
Car Vastu Tips: नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी कारमध्ये ठेवा 'या' ५ वस्तू, प्रवास होईल सुखाचा

कर्क - तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यास उपाय मिळतील. महत्वाच्या व्यवहारात गुप्तता ठेवावी लागेल.

सिंह - मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. गणपतीला काजळ लावून नारळ अर्पण केल्याने कार्यसिद्धी मिळेल.

कन्या - नवीन नौकरी साठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. गृहिणींसाठी आनंदाचा दिवस राहील.V

Horoscope
Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

तुला - तुमचा अतिशय उत्साहात दिवस जाईल. पोटाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्यावी.

वृश्चिक - शक्य असल्यास सोने-चांदीची खरेदी करावी. प्रेमात यशस्वी व्हाल.

धनू - दिवसभर स्वतःला एका विशिष्ट मूडमध्ये ठेवाल. सल्लागार लोकांना भरपूर क्लायंट मिळतील.

Horoscope
Vastu Shastra: संध्याकाळी 'या' वेळेत घरात प्रवेश करते देवी लक्ष्मी; ही खास कामं जरूर करा

मकर - जूनी संपत्ती विकायची असल्यास विषयावर चर्चा करता येईल. गणरायांचं नामस्मरण केल्याने फायदेशीर ठरेल.

कुंभ - नवीन लोकांसोबत परिचय होईल. लोखंड, तेल, सोने उद्योजकांना लाभ होईल.

मीन - वैयक्तिक जीवन आनंदी आणि सुखद संधी पूरेपूर मिळेल. उद्योगात यश मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com