Sakshi Sunil Jadhav
बऱ्याचदा प्रवासात खूप नकारात्मकता जाणवते. अशावेळेस काही वाहनांचे वास्तूचे महत्व जाणून घेतले पाहिजे. त्यामध्ये काही वस्तूंचा समावेश होतो.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही कारमध्ये काही वस्तू ठेवल्याने चांगली ऊर्जा ठिकते, आणि ड्रायव्हिंग करताना अडचणी येत नाही तसेच चांगला अनुभव येतो.
वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये मोरपंख ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. तसेच हे शुभ असल्याकारणाने सकारात्मकता वाढते.
तुम्ही लांब प्रवास करत असाल तर कोणत्याही धातूचा कासव तुमच्या गाडीत ठेवू शकता. त्याने स्थैर्य, संरक्षण आणि वाहन सुरक्षा वाढते.
तुमच्या राशीनुसार तुम्ही रत्न किंवा क्रिस्टल कारमध्ये ठेवू शकता. त्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि मानसिक शांती देते.
गाडीमध्ये पाण्याची बाटली ठेवणं ही सामान्य बाब आहे, पण ती नेहमी भरलेली असावी. रिकामी बाटली नकारात्मकता वाढवते असा समज आहे.
गाडीमध्ये कोणत्याही देवाची डॅशबोर्डवर राहील अशी लहान आकाराची मूर्ती तुमचे संरक्षण वाढवते. तसेच नकारात्मकता तुमच्यापासून दूर राहते.
तुम्ही कारमध्ये तुटलेल्या वस्तू ठेवत असाल तर नकारात्मकता वाढण्याचे संकेत जास्त असतात. त्यामुळे अशा वस्तू सोबत ठेवणे टाळा.
गाडीच्या डॅशबोर्डवरील गोंधळ मानसिक गोंधळ आणि निगेटिव्ह वायब्रेशन्स निर्माण करतो. तो नेहमी स्वच्छ ठेवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.