महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न; काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा जोरदार घणाघात

satej patil on ravindra chavan : महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
kolhapur news
congress Saam tv
Published On
Summary

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण तापलं

भाजपकडून महापुरुषांच्या इतिहासात बदल करण्याचा प्रयत्न - सतेज पाटील

सतेज पाटील यांच्याकडून भाजपवर टीका

रणजित माजगांवकर, साम टीव्ही

कोल्हापूर : भाजपकडून जाणीवपूर्वक महापुरुषांच्या इतिहासात बदल करण्याचा प्रयत्न सुरू असून ही भाजपची वैचारिक दिवाळखोरी असल्याची जोरदार टीका काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले.

कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर भाजपवर हल्लाबोल केला. भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रवींद्र चव्हाण यांची भूमिका मान्य आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं. केंद्रातील भाजपच्या नेत्यांनीही यावर भूमिका मांडली पाहिजे. आधी चुकीचं वक्तव्य करायचं, डिजिटल फुटप्रिंट ठेवायचा आणि नंतर माफी मागायची हा भाजपचा ठरलेला षडयंत्र आहे. रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये मॅच्युरिटी दिसत नाही. महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने जनतेसमोर मांडून संभ्रम निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे. पुढच्या शंभर वर्षांसाठी इतिहास बदलण्याचं नियोजन भाजपने केलं आहे.

kolhapur news
मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सतेज पाटील यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा मतांसाठी एकमेकांच्या विरोधात भांडतात, पण मुळात हे एकच आहेत. फक्त जनतेला दाखवण्यासाठी भांडणं सुरू आहेत. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, हे दोघांनीही आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारावं'.

महापालिका निवडणुकांबाबत बोलताना बिनविरोध नगरसेवक निवडीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक बिनविरोध होणं म्हणजे लोकशाही संपवण्यासारखं आहे. तुमचा उमेदवार निवडून येऊ द्या, पण किमान इतरांना उभं राहू द्या. स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शहरांच्या विकासासाठी एक लाख कोटींचा निधी दिला होता. शहरांसाठीची पहिली योजना मनमोहन सिंग यांनीच आणली होती, हे कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विसरले असतील.

kolhapur news
उपराष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला, खिडकींच्या काचा फुटल्या; संपूर्ण अमेरिकेत खळबळ

सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले, सुजात आंबेडकर यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं संयुक्तिक नाही. किमान 15 तारखेपर्यंत आपलं आपलं टार्गेट भाजप असलं पाहिजे, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com