Bigg Boss Marathi : "मी पण लायकी काढू शकते..."; राधा पाटील दिपाली सय्यदवर भडकली, 'लावणी'वरून राडा-VIDEO

BB Marathi 6-Dipali-Radha Fight : बिग बॉसच्या घरात 'लावणी'वरून वाद झाला आहे. दिपाली सय्यदच्या बोलण्याने राधा पाटील दुखावली. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
BB Marathi 6-Dipali-Radha Fight
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात राशन टास्क पार पडला.

दिपाली सय्यदच्या बोलण्याने राधा पाटील दुखावली.

दिपाली सय्यद आणि राधा पाटीलमध्ये 'लावणी'वरून वाद होतो.

बिग बॉसच्या खेळाला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. या सीझनचा पहिला राशन टास्क घरात रंगणार आहे. या टास्कचे नाव 'मिशन राशन' असे होते. मात्र यातही सदस्यांमध्ये तुफान भांडणे होताना पाहायला मिळाली. टास्क दरम्यान घरातील एका सदस्याची प्रकृती बिघडते. घरातील सदस्य डॉक्टरांना बोलावतात. अशात आता बिग बॉसने नवीन एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात अभिनेत्री दिपाली सय्यद 'लावणी' विषयी बोलताना दिसत आहे.

तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, बिग बॉसच्या घरात जेवणाची तयार सुरू असते. काही लोक जेवण बनवताना दिसत आहेत. तर काही डाइनिंग टेबलवर बसून गप्पा मारत आहेत. तेव्हा दिपाली सय्यद 'लावणी' आणि बार डान्सर बद्दल असे काही बोलतात ज्यामुळे राधा पाटील भावुक होते आणि रडू लागते. नेमकं घरात काय झालं जाणून घेऊयात. दिपाली डाइनिंग एरियात बसून बोलत आहे. तर ते ऐकून झाल्यावर राधा बाहेर गार्डनर एरियात येऊन घरातील एका सदस्यांशी बोलत आहे.

दिपाली-राधा नेमकं काय बोलल्या?

  • दिपाली सय्यद - "लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतो आपण..."

  • राधा पाटील - "दिपाली ताई लावणीवरून जे मला बोलता आहेत ना, मग मी पण लायकी काढू शकते..."

  • दिपाली सय्यद - "बार डान्सर ते तुम्ही स्टेजवर घेऊन येता..."

बिग बॉसने प्रोमोला "दिपालीच्या बोलण्याने दुखावलं गेलंय राधाचं मन..." असे कॅप्शन लिहिलं आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक दिपालीची बाजू घेताना दिसत आहेत. तर काही लोक "दिपालीने राधाला असं बोलायला नाही पाहिजे..." म्हणत आहे. आता बिग बॉसच्या घरात 'लावणी' वरून नका कोणता राडा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओ हॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

BB Marathi 6-Dipali-Radha Fight
Amruta Deshmukh : "घाणेरडे वॉशरूम, डास चावतात..."; अमृता देशमुख संतापली,VIDEO शेअर करून दाखवली बालगंधर्व रंगमंदिराची दयनीय अवस्था

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com