Shashank Ketkar : "ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या बाहेर 'ही' अवस्था..."; शशांक केतकर चिडला, पाहा VIDEO

Shashank Ketkar Video : मराठी अभिनेता शशांक केतकरने मतदान केल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने मतदान केंद्राबाहेरची परिस्थिती दाखवली आहे.
Shashank Ketkar Video
Shashank Ketkarsaam tv
Published On
Summary

अभिनेता शशांक केतकर सध्या 'मुरांबा' मालिकेत झळकत आहे.

शशांक केतकरने मतदानाचा हक्क बजावला आहे.

शशांक केतकरने एक व्हिडीओ पोस्ट करून मतदान केंद्राबाहेरची परिस्थिती दाखवली आहे.

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्व सामान्य जनता, कलाकार मंडळी आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. तसेच अनेक कलाकार मतदान करण्याचे जनतेला सांगताना दिसत आहे. अशात मराठी अभिनेत्याने नुकतीच एक पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मराठी अभिनेता शशांक केतकर मतदान झाल्यानंतर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

शशांक केतकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ आहे. ज्यात तो पहिला मतदानाचा हक्क बजावल्याचे सांगत आहे. त्याने ज्या शाळेमध्ये मतदान केले. त्या शाळेबाहेर कचऱ्याचा डीग पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिनेता चांगलाच संतापला आहे. शशांक केतकरने ठाणे येथे मतदान केले. ती शाळा ठाण्यातील International School आहे. व्हिडीओत शशांक म्हणतो की, "ज्या शाळेत मतदान केलंय त्या शाळेच्या बाहेरच ही अवस्था आहे..."

शशांक केतकरची पोस्ट

"ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या Exact बाहेर 'ही' अवस्था आहे . उद्या कोणत्याही पार्टीतला कोणीही निवडून आला तरी 'स्वच्छता; या Basic गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरिक सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे. ही माझ्या मनातली उदासीनता, Negativity नाहीये...वस्तुस्थिती आहे...INTERNATIONAL SCHOOL आहे ही ठाण्यातली त्या शाळेच्या दारात ही अवस्था आहे..."

शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहे. शशांकने याआधी देखील अनेक सामाजिक विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले आहे. सध्या शशांक 'मुरांबा' मालिकेत दिसत आहे. काही दिवसांपासून तो निर्माते मंदार देवस्थळींनी त्याचे 5 लाख रुपये थकवल्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच शशांक केतकरने पोस्ट करून यांसंबंधित मोठा खुलासा केला.

Shashank Ketkar Video
Famous Director : प्रसिद्ध दिग्दर्शकाची फसवणूक; 5 लाखांचा गंडा, FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com