प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्याला फसवण्यात आले आहे.
दिग्दर्शकाने पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शकाची तब्बल 5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता दीपक तिजोरी यांना त्याचा आगामी हिंदी चित्रपट 'टॉम, डिक अँड मेरी' साठी फंड देण्याच्या नावाखाली 2.5 लाख रुपयांना फसवण्यात आले आहेत. याची तक्रार अभिनेत्याने पोलीस स्टेशनला केली आहे. अभिनेत्याच्या तक्रारीवरून, मुंबईच्या बांगूर नगर पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक तिजोरी गोरेगाव पश्चिम येथील गार्डन इस्टेट येथे राहतात. 1990 पासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. निर्माता डिसेंबर 2024 पासून 'टॉम, डिक अँड मेरी' नावाच्या आपल्या नवीन हिंदी चित्रपटाच्या पटकथेवर काम करत होता. या प्रोजेक्टसाठी तो आर्थिक मदतीच्या शोधात होता. तक्रारीत असेही म्हटले आहे की, दीपक तिजोरी यांना झी नेटवर्कचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या जोशी नावाच्या व्यक्तीशी फोनवर संपर्क साधण्यात आला होता. नंतर झी नेटवर्कमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पडताळणी केली असता असे दिसून आले की त्या नावाचा कोणीही संस्थेत नोकरी करत नव्हता.
दीपक तिजोरी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात कविता शिबाग कपूर नावाची एक महिला तिजोरींच्या घरी आली आणि तिने टी-सीरीजशी संबंधित असल्याचा दावा केला. तिने झी नेटवर्क आणि मिडियाशी चांगले कनेक्शन असल्याचे सांगितले. त्यानंतर कविता, दीपक तिजोरी आणि तिची सहकारी फौजिया आरसी यांच्यात एक मीटिंग झाली. तेव्हा दीपक तिजोरीला सांगण्यात आले की, झी नेटवर्ककडून चित्रपटासाठी लेटर ऑफ इंटरेस्ट (LOI) मिळवू शकते. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, दीपक तिजोरी यांना 5 लाख रुपये 2 हप्त्यांमध्ये देण्यास सांगितले. दीपक यांनी हप्त्याची पहिली रक्कम 2.5 भरली.
दीपक तिजोरी यांनी असा आरोप केला की, दोन्ही महिलांनी त्यांना एका आठवड्यात LOI देण्याचे आश्वासन दिले आणि पहिला हप्ता म्हणून 2.5 लाख रुपये मागितले. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून, 21 फेब्रुवारी 2025 रोजी एक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. त्यानंतर, 22 फेब्रुवारी 2025 रोजी दीपक तिजोरी यांनी फौजिया आरसी यांच्या बँक खात्यात 2.5 लाख रुपये ट्रान्सफर केले. बराच वेळ होऊनही त्यांना झी नेटवर्ककडून लेटर ऑफ इंटरेस्ट (LOI) मिळाला नाही आणि पैसे परत आले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, दीपक तिजोरी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. बांगूर नगर पोलिसांनी 13 जानेवारी 2026 रोजी कविता शिबाग कपूर, फौजिया आरसी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे आणि पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.