Rohit sharma: आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये! कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचा जुना Video होतोय व्हायरल

Rohit Sharma Old Video Viral: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एकदिवसीय (ODI) संघाच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून युवा खेळाडू शुभमन गिलची (Shubman Gill) नियुक्ती केल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Rohit Sharma old Video viral
Rohit Sharma old Video viralsaam tv
Published On

येत्या १९ ऑक्टोबरपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सिरीज सुरु होणार आहे. यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ३ वनडे सामन्यांच्या सिरीजनंतर ५ टी-२० सामन्यांची सिरीजही खेळवली जाणार आहे. यासाठी नुकतंच टीम इंडियाची घोषणा झाली आणि रोहित शर्माच्या सर्व चाहत्यांचा हिरमोड झाला. याचं कारण म्हणजे रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढून टाकण्यात आलं.

टेस्ट क्रिकेटनंतर आता वनडे इंटरनॅशनल फॉर्मेटमध्ये देखील कर्णधारपदाची धुरा ही शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. टीमची घोषणा होण्यापूर्वीच गिलला कर्णधार केल्याची चर्चा रंगली होती. अखेरीस त्यावर शिक्कामोर्तब झालंच. अशातच आता नवा कर्णधार कोण असावा याबाबत रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

Rohit Sharma old Video viral
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या वनडे, टी-२० संघाची घोषणा, भारताविरोधात कोणकोण मैदानात उतरणार, पाहा संपूर्ण संघ

यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये रोहित शर्माने स्वतःला एका सामन्यातून बाहेर बसवलं होतं. त्यावेळी येणाऱ्या काळात बुमराहशिवाय कोणता खेळाडू टेस्टचा कॅप्टन बनेल असा प्रश्न माजी खेळाडू इरफान पठाणने हिटमॅनला केला होता.

Rohit Sharma old Video viral
Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्माचे कर्णधारपद काढलं, गिलकडे नवी जबाबदारी, ऑस्ट्रोलिया दौऱ्यात भारतीय संघात मोठे बदल

काय म्हणाला होता रोहित शर्मा?

इरफानच्या या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला होता की, आताच सांगणं फार कठीण आहे. कारण अनेक तरूण खेळाडू आहेत. मला असं वाटतं की, या तरूण मुलांनी पहिल्यांना क्रिकेटचं महत्त्व समजलं पाहिजे. या फॉर्मेटचं आणि फॉर्मेटमध्ये खेळण्याचं महत्त्व त्यांनी समजून घेतलं पाहिजे.

Rohit Sharma old Video viral
Rohit Sharma: टीम इंडियामध्ये उलटफेर! रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार, शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवणार

थाळीत सजावून कोणालाही कर्णधारपद मिळालेलं नाही- रोहित

रोहित पुढे म्हणाला, ही मुलं फार नवीन आहेत. मला माहितीये की, नव्या मुलांवर जबाबदारी दिली पाहिजे, पण त्यांना अजून खेळूदेत. त्यांनी पुढची अजून काही वर्ष हार्ड क्रिकेट खेळावं. मुळात मी काय, बुमराह किंवा कोहली आम्ही सर्वांनी हे कर्णधारपद कमावलं होतं. कोणालाही थाळीत सजवून कॅप्टन्सी दिली गेलेली नाही. त्यामुळे असं आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये, नव्या खेळाडूंनी ही गोष्ट कमावली पाहिजे.

Rohit Sharma old Video viral
IND vs WI: अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय; सिराज-जडेजासमोर विंडीजने नांगी टाकली

नव्या खेळाडूंमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे. पण मला असं वाटतं की, टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवणं ही साधी किंवा सोपी गोष्ट नाही. भारताचा कॅप्टन बनणं हा एक खूप मोठा सन्मान आहे. आपला इतिहास आणि इतर गोष्टी पाहता कर्णधारपद ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना ती गोष्ट स्वतः कमावूदेत, असंही रोहित शर्मा म्हणाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com