IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या वनडे, टी-२० संघाची घोषणा, भारताविरोधात कोणकोण मैदानात उतरणार, पाहा संपूर्ण संघ

Australia announce squad for India tour : भारताविरोधात होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे. मिचेल मार्श संघाचे नेतृत्व करणार असून मिचेल स्टार्कचे संघात पुनरागमन झाले आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि संघाची माहिती.
IND vs AUS Record:
ind vs austwitter
Published On

IND vs AUS Series 2025: भारताविरोधात होणाऱ्या आगामी वनडे आणि टी २० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. १९ ऑक्टोबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात होणार आहे. तीन वनडे आणि ५ टी२० मालिकेचा थरार रंगणार आहे. रोहित आणि विराट हे भारताचे सर्वात अनुभवी खेळाडू वनडेमध्ये खेळताना दिसणार आहेत. या जोडीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने स्टार खेळाडूंना संघात स्थान दिलेय. ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मिचेल मार्श वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करेल.

ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि मॅट शॉर्ट यांचं संघात कमबॅक झालेय. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. स्टार्क, शॉर्ट यांच्याशिवाय मॅन रेनशॉ आणि मिशेल ओवन यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. मिचेल स्टार्कच्या कमबॅकमुळे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी अधिक भक्कम होतेय. ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का पॅट कमिन्सच्या रूपाने बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श संघाचे नेतृत्व करत आहे.

IND vs AUS Record:
Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ:

मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेज़लवूड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, एडम जम्पा

ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ (पहिल्या दोन सामन्यांसाठी):

मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेविड, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, जोश हेज़लवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमैन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, एडम ज़म्पा

IND vs AUS Record:
पत्नीच्या निधनाचा धक्का, पतीनेही प्राण सोडले; एकाच वेळी अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याचे वेळापत्रक :

पहिला वनडे: 19 ऑक्टोबर, पर्थ

दुसरा वनडे: 23 ऑक्टोबर, एडिलेड

तिसरा वनडे: 25 ऑक्टोबर, सिडनी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याचे वेळापत्रक :

पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना: 29 ऑक्टोबर, कॅनबेरा

दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना: 31 ऑक्टोबर, मेलबर्न

तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना: 2 नोव्हेंबर, होबार्ट

चौथा टी-20 सामना: 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट

पाचवा टी-20 सामना: 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन

IND vs AUS Record:
Home Remedy : उंदराला घरातून पळवण्याचा एकदम सोपा उपाय, फक्त एक बिस्टिक अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com