
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्या पहिला टेस्ट सामना रंगला होता. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४० रन्सने पराभव केला आहे. वेस्ट इंडिजची संपूर्ण टीम अवघ्या १४६ रन्सवर ऑल आऊट झाली. या विजयामुळे भारताने २ सामन्यांच्या सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
या टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा संघ १६२ रन्समध्ये गुंडाळला. त्यानंतर टीम इंडियाने १२८ ओव्हर्समध्ये ५ गडी गमावून ४४८ रन्स केले आणि आपला पहिला डाव घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे भारताने वेस्ट इंडिजवर २८६ धावांची आघाडी घेतली.
भारताकडून केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या डावात शतकं झळकावली. केएल राहुल १९७ चेंडूत १०० रन्स करून बाद झाला. ध्रुव जुरेलने १२५ रन्स केले. रवींद्र जडेजा १०४ रन्सवर नाबाद राहिला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची टीम १४६ रन्सवर ऑलआउट झाली आणि भारताने सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.