Bigg Boss Marathi 6 : गेम पलटला; बिग बॉसच्या घरात राखी सावंतची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Rakhi Sawant Wild Card Entry : बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. राखी सावंतच्या येण्याने शो ला चारचाँद लागले आहेत. घरात नवीन कोणता राडा होणार, जाणून घेऊयात.
Rakhi Sawant Wild Card Entry
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.

ओमकार राऊतने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला.

'बिग बॉस मराठी 6'मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत आली आहे.

'बिग बॉस मराठी 6' मधून चौथ्या आठवड्यात दोन सदस्य बाहेर पडले. सर्वात आधी घरातील सदस्यांना धमकी दिल्यामुळे दिव्या शिंदेला घर सोडाव लागले. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर ओमकार राऊतने घराचा निरोप घेतला. ओमकारच्या जाण्याने घरातील सदस्य खूपच दुःखी झाले. अशात आता बिग बॉसने चाहत्यांना भन्नाट सरप्राइज दिले आहे. अखेर बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीनची एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस मराठी 6'ची पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची शोमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, "आली Entertainment ची लहर, BIGG BOSS मराठीच्या घरात पसरणार राखीचा कहर!" बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते तुफान कमेंट्स करताना दिसत आहे. आता खऱ्या अर्थाने 'बिग बॉस मराठी 6' झाल्याचे प्रेक्षक बोलत आहे. आता राखी सावंत घरातील कोणत्या सदस्याचा पर्दाफाश करते, कोणाला रडवते आणि कोणासाठी लढते हे सर्वच पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

राखी सावंत बिग बॉसच्या घरात नागिन अवतारात येते. तिला पाहून घरातील सदस्य खूपच खुश आणि आनंदी होतात. मात्र घरात येता क्षणी राखी एका सदस्याला चांगलीच टार्गेट करते. त्यामुळे राखीच्या येण्याने घरातील सदस्यांचे नक्कीच टेन्शन वाढले आहे. घरात एन्ट्री घेताच राखी सावंत राकेश बापटला "माझा नागोबा" बोलते. सर्वजण हसू लागतात. त्यानंतर ती तन्वीकडे जाते. बोलते, "तन्वी कोलसे..." तेव्हा तन्वी बोलते, "तन्वी कोलते..." त्यावर राखी म्हणते की, "तन्वी कोलते आता मी तुला मस्त सोलते..." बिग बॉसच्या घरात येताच राखी सावंतने तन्वी कोलतेशी पंगा घेतला आहे.

राखी सावंत बिग बॉसच्या घरात जाताना म्हणते की, "राखी जाणार, गेम पालटणार. माझ्याशिवाय 'बिग बॉस मराठी' अधूरे आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होणार. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तेव्हा फक्त तिची मर्जी चालणार आहे..." आता राखी नावाचे वादळ घरात कोणता राडा घालणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Rakhi Sawant Wild Card Entry
Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, संगीत विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com