Bigg Boss Marathi 6 - Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi 6saam tv

Bigg Boss Marathi 6 : रितेश भाऊ रुचितावर भडकला; म्हणाला-"सगळ्यात मोठा Villain...", पाहा धमाकेदार VIDEO

Bigg Boss Marathi 6 - Bhaucha Dhakka : बिग बॉसच्या घरात आज भाऊचा धक्का गाजणार आहे. रितेश देशमुख रुचिताला तिच्या चुकांचा पाढा वाचून दाखवणार आहे.
Published on
Summary

बिग बॉसच्या घरातून दिव्या शिंदेची एक्झिट झाली आहे.

'बिग बॉस मराठी 6'मध्ये राखी सावंत येणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख रुचिताला तिच्या चुकांचा पाढा वाचून दाखवतो.

'बिग बॉस मराठी 6' मध्ये आज शनिवारी चौथ्या भाऊचा धक्का रंगणार आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात खूपच जास्त ड्रामा पाहायला मिळाला. घरातील सदस्यांना धमकी दिल्यामुळे दिव्या शिंदेला घरातून बाहेर काढण्यात आले. तसेच आता घरात राखी सावंत येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नुकताच बिग बॉसने एक खास प्रोमो शेअर केला आहे. ज्यात रितेश देशमुख संतापलेला पाहायला मिळत आहे.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओत रितेश भाऊ रुचिताची चांगली शाळा घेताना दिसत आहे. या आठवड्यात रुचिताच राकेश बापट आणि दिपाली सय्यदसोबत कडाक्याचे भांडण होते. प्रोमोच्या व्हिडीओमध्ये रितेश भाऊ रुचिताला म्हणतात की, "रुचिता या घराचा सगळ्यात मोठा व्हिलन तुम्ही ठरला आहात...सतत उद्धट वागायचे... टास्क रद्द कसा होईल तेच बघायचे...एकही दिवस असा सोडला नाही जिथे तुम्ही लिमिट क्रॉस केली नाही..."

व्हिडीओच्या शेवटी रुचिताला रितेश भाऊ हातात कुऱ्हाड घ्यायला सांगताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पडत आहे. रुचिताची शाळा घेतल्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. रुचिता शोच्या पहिल्या दिवसापासून घरात भांडताना, गोंधळ घालताना दिसत आहे. तन्वी आणि रुचितामध्ये कायम भांडणे होताना पाहायला मिळतात.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात ओमकार राऊत, आयुष संजीव, सचिन कुमावत, प्रभू शेळके, दिपाली सय्यद, अनुश्री माने, दिव्या शिंदे, रोशन भजनकर आणि राकेश बापट यांचा समावेश आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून राधा पाटील, सोनाली राऊत आणि दिव्या शिंदे हे तीन सदस्य बाहेर गेले आहेत. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 6 - Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात येणार राखी सावंत? सदस्यांना सळो की पळो करणार, खऱ्या अर्थाने आता गेम सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com