Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, संगीत विश्वावर शोककळा

Famous Singer Passes Away : प्रसिद्ध गायकाचे निधन झाले आहे. मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. गायकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Famous Singer Passes Away
Famous Singer Deathsaam tv
Published On
Summary

संगीत विश्वावर शोककळा पसरली.

प्रसिद्ध गायकाचे 47 च्या वर्षी निधन झाले आहे.

गायक खूप वेळापासून कॅन्सरशी झुंज देत होता.

मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. ग्रॅमी पुरस्कार नामांकित रॉक बँड '3 डोअर्स डाउन'चे (3 Doors Down) मुख्य गायक ब्रॅड अरनॉल्ड (Brad Arnold) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 47 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. गायक खूप वेळापासून कॅन्सरशी लढा देते होते. अखेर 7 फेब्रुवारी 2026 ला म्हणजे काल शनिवारी ब्रॅड अरनॉल्ड यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.

2017 मध्ये, 3 डोअर्स डाउनने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या उद्घाटन मैफिलीत परफॉर्मन्स केला. गायकाने गेल्या वर्षी 2025 मे महिन्यात आपल्याला कर्करोग असल्याचे चाहत्यांना सांगितले. त्यांना स्टेज ४ किडनी कॅन्सर (stage 4 kidney cancer) होता. तेव्हा गायकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. गायकाने आपल्या आवाजाने जगाला वेड लावले होते. निधनाची बातमी समजताच जगभरातील संगीतप्रेमी, सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 3 डोअर्स डाउन रॉक बँडची स्थापना 1995 मध्ये मिसिसिपीमध्ये झाली आणि चार वर्षांनंतर त्यांच्या हिट गाण्यासाठी 'क्रिप्टोनाइट'साठी (Kryptonite) ग्रॅमी नामांकन मिळाले. बँडच्या निवेदनानुसार, अर्नोल्डने 15 वर्षांचा असताना हे गाणे लिहिले. त्यांचा पहिला अल्बम, 'द बेटर लाइफ' च्या 6 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. 2003 मध्ये त्यांना 'व्हेन आय एम गॉन'( When I'm Gone) या गाण्यासाठी त्यांचे दुसरे ग्रॅमी नामांकन मिळाले.

3 डोअर्स डाउनने 2016 मध्ये 6 अल्बम रिलीज केले, त्यातील सर्वात अलिकडील अल्बम 'अस अँड द नाईट' होता. सिंगल्समध्ये लॉसर, डक अँड रन, आणि बी लाईक दॅट यांचा समावेश होता. जो 2001 च्या 'अमेरिकन पाय 2' चित्रपटाच्या साउंडट्रॅकवर प्रदर्शित झाला होता.

Famous Singer Passes Away
Ramayana Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com