

बिहारमध्ये गरोदर महिलेची हत्या
गॅस सिलिंडरच्या वादातून भांडण
नवऱ्याने बेदम मारहाण करून केली हत्या
पोलिसांनी आरोपीला अटक केली
बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यामध्ये गॅस सिलिंडरच्या वादातून एका तरुणाने बायकोची निर्घृण हत्या केली. ही घटना मुजफरा गावात घडली. हत्या करण्यात आलेली महिला २१ वर्षाची होती आणि ती ९ महिन्यांची गरोदर होती. आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही घटना घडली. २१ वर्षीय लक्ष्मी देवी जेवण बनवण्यासाठी नवऱ्याकडे गॅस सिलिंडरची मागणी करत होती. १० दिवसांपासून घरातील गॅस सिलिंडर संपला होता. त्यामुळे लक्ष्मीला चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. लक्ष्मी ९ महिन्यांची गरोदर होती त्यामुळे तिला चुलीवर स्वयंपाक करायला त्रास होत होता. त्यामुळे ती नवऱ्याकडे गॅस सिलिंडरची सतत मागणी करत होती.
मंगळवारी रात्री लक्ष्मीने नवऱ्याकडे गॅस सिलिंडरची मागणी केली. यावरून नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतप्त झालेल्या राजाने बायकोला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. बायकोच्या पोटात बाळ आहे याचा देखील त्याने विचार केला नाही. या मारहाणीत त्याच्या बायकोचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर लक्ष्मीच्या माहेरकडच्यांना फोन करून ती पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीच्या सासरकडच्यांनी मोबाइल स्वीच ऑफ केला. या घटनेनंतर लक्ष्मीच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरी येत राडा केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मीच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी राजाला दारूचे व्यसन होते आणि तो नेहमी बायकोला मारहाण करायचा. त्याला अडीच वर्षांची मुलगी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.