Samay Raina: देवेंद्र फडणवीसांकडून समय रैनाचा सत्कार, ती एक कृती अन् मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना

Samay Raina: मुंबईतील सायबर-जागरूकता कार्यक्रमात समय रैना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. रैनाने महाराष्ट्र सायबरचे मिश्किलपणे कौतुक करत १९३० हेल्पलाइनचा उल्लेख केला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
Samay Raina
Samay RainaSaam Tv
Published On

Samay Raina: प्रसिद्ध कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैनाने बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. सायबर-जागरूकतेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समय रैनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी समय रैनाने ‘महाराष्ट्र सायबर’च्या कामाचे कौतुक करत सायबर फसवणुकीविरोधात नागरिकांनी सतर्क राहण्याचे मिश्किल पद्धतीने आवाहन केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमात समय रैना यांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक ‘१९३०’चा विशेष उल्लेख करत मिश्किल पद्धतीने म्हणाला, "'१९३०' हा खरोखरच एक उत्तम नंबर आहे. मी तो सेव्ह करून ठेवला आहे कारण मला अनेकदा तिथून फोन येतात." हे विधान ऐकताच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी एकच हास्यकल्लोळ केला. त्यांनी सायबर सेलच्या तत्परतेचेही कौतुक केले आणि गमतीने म्हटले की, त्यांचे अधिकारी भारतात असोत वा अमेरिकेत, कोणाचाही उचलू शकतात एवढं लक्ष सायबर टिमचं सर्वांकडे असतं आणि आज असं पहिल्यांदाच झालं आहे की सायबर सेलचे ऑफिसर एक कॉमेडियनच्या घरी गेले त्याला त्याच्या घरुन उचलून न्हेल पण कौतुक करण्यासाठी त्यासाठी सर्वांचे धन्यवाद

तसेच यावेळी समय रैनाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याने मस्करीत मुख्यमंत्र्यांना तुमच्या समोरील प्लेटमधील बिस्किट मी घेऊ का अशी विचारणा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी हसत होकार दिला हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Samay Raina
Famous Actor Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ अभिनेत्याचे दीर्घ आजाराने निधन

समय रैनासह अनेक कलाकारांचा सन्मान

महाराष्ट्रातील सायबर-जागरूकता उपक्रमाला हातभार लावणाऱ्या कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. समय रैना यांच्यासोबत अभिनेते पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, आशिष विद्यार्थी, जावेद जाफरी आणि मंगेश देसाई तसेच गायिका सुनिधी चौहान यांचाही सन्मान करण्यात आला.

Samay Raina
Famous Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा २३व्या वर्षी दुर्दैवी अंत; महाकालच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, आईचाही मृत्यू

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर-जागरूकता लघुपटाचे आणि ‘१९३० महाराष्ट्र सायबर अँथम’चे अनावरण करण्यात आले. नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि इतर सायबर गुन्ह्यांपासून सावध करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com