Dhurandhar : 'धुरंधर'च्या डिझाइनरवर बलात्काराचा गुन्हा, तरुणीला हॉटेल रुममध्ये बोलावलं अन्...

Dhurandhar Production Designer : 'धुरंधर' या चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझायनरवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला त्याने हॉटेल रुममध्ये बोलावले, नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Dhurandhar Production Designer
DhurandharSAAM TV
Published On
Summary

'धुरंधर'च्या डिजाइनरवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पीडित महिलेला चित्रपटात काम देण्याचे दाखवले आमिष

पोलीस तपास सुरू

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'धुरंधर'चे प्रोडक्शन डिझायनर जॉन जोसेफ उर्फ ​​जोएल (Saini S Johray-सैनी एस. जोहरे) यांच्या विरोधात चंदीगडमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा आरोप आहे की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हॉटेलच्या रुमवर जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिचा छळही झाला.

livehindustanच्या वृत्तानुसार, पीडित महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे, सेक्टर १७ पोलीस ठाण्याने भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ७९, १२३, १२६ (२) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागपूरच्या रहिवासी महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, २०२५ मध्ये, सेक्टर १८ मधील टागोर थिएटरमध्ये 'धुरंधर' चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिची भेट चित्रपटाच्या प्रोडक्शन टीममधील सदस्य जॉन जोसेफ यांच्याशी झाली.

Dhurandhar Production Designer
Renuka Shahane Photos : २५ वर्षांची अनोखी प्रेम काहाणी! रेणुका शहाणे अन् आशुतोष राणा पुन्हा अडकलं लग्नबंधनात; अभिनेता म्हणाला- "आनंदाने भरलेला काळ"

प्रोडक्शन डिझायनरने तिला चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले आणि तिला अनेक प्रोजेक्ट्स देऊ केले. त्यानंतर दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. पीडितेचा आरोप आहे की, २ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपी तिला सेक्टर १७ मधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तक्रारीनुसार, प्रकल्पावर काम सुरू झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी जोहरेने तिला सेक्टर १७ मधील एका हॉटेलच्या रुमवर व्यावसायिक चर्चेसाठी बोलावले. प्रोडक्शन डिझायनरने तिच्यावर दारू पिण्यासाठी दबाव टाकला.

तक्रारीत महिलेने पुढे सांगितले की, आरोपीने तिला धमकावले आणि या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. नंतर त्याने तिच्यावर हल्ला केला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींचा विचार करून कारवाई केली जाईल.

Dhurandhar Production Designer
Pravin Tarde-Deool Band 2 : स्वामींचे तेजस्वी रूप पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध; 'देऊळ बंद २' सुसाट, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची ५ व्या दिवशी कमाई किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com