Mumbai : मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अडकला हनीट्रॅपमध्ये, तरुणीने घातला तरुणाला २१ लाखांचा गंडा

Mumbai Crime News : मुंबईत डेटिंग ॲप Bumble वरून ओळख झालेल्या तरुणीने गुंतवणुकीचे आमिष दाखवत इंटिरियर डिझायनरची 21.5 लाख रुपयांची फसवणूक केली. बनावट डॅशबोर्डवर 69 लाखांचा नफा दाखवून आरोपींनी मोठी रक्कम उकळली.
MUMBAI BUMBLE SCAM: INTERIOR DESIGNER LOSES ₹21.5 LAKH IN FAKE FOREX INVESTMENT FRAUD
MUMBAI BUMBLE SCAM: INTERIOR DESIGNER LOSES ₹21.5 LAKH IN FAKE FOREX INVESTMENT FRAUDSaam tv
Published On
Summary
  • बंबल डेटिंग ॲपवरून सुरू झालेली ओळख पडली महागात

  • ‘डार्विनएक्स’ नावाच्या बनावट प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीचे आमिष

  • 69 लाखांचा खोटा नफा दाखवून 21.5 लाख रुपये उकळले

  • ‘अ‍ॅडव्हान्स टॅक्स’ मागणीमुळे संशय, सायबर पोलिसांकडे तक्रार

मुंबईत सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून गुन्हेगार लोकांना कसे जाळ्यात ओढतात याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे. बंबल या डेटिंग ॲपवरील एका साध्या ‘स्वाइप’मुळे भायखळ्यातील ३८ वर्षीय इंटिरियर डिझायनरला तब्बल २१.५ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाची काही दिवसांपूर्वी बंबल ॲपवर एका अज्ञात तरुणीशी ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू गप्पा रंगू लागल्या आणि त्या तरुणीने विश्वास संपादन करत सुरुवातीला टेलिग्राम आणि नंतर व्हॉट्सॲपवर चॅटिंग करायला सुरुवात केली. या दरम्यान तिने स्वतःला शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगची माहिती असल्याचं संबंधित तरुणाला सांगितलं.

MUMBAI BUMBLE SCAM: INTERIOR DESIGNER LOSES ₹21.5 LAKH IN FAKE FOREX INVESTMENT FRAUD
Mumbai Rain Alert : वातावरण बदललं! मुंबईत पुढील काही तासांत धो धो पाऊस कोसळणार, IMD कडून अलर्ट

विश्वास जिंकल्यानंतर तिने ‘डार्विनएक्स’ नावाच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. कमी कालावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवत तिने तरुणाला गुंतवणुकीस प्रवृत्त केले. सुरुवातीला १ एप्रिल रोजी तरुणाने ५० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्याला एका बनावट डॅशबोर्डवर मोठा नफा दाखवण्यात आला. हा नफा पाहून त्याचा विश्वास अधिक दृढ झाला.

MUMBAI BUMBLE SCAM: INTERIOR DESIGNER LOSES ₹21.5 LAKH IN FAKE FOREX INVESTMENT FRAUD
Bank Closed : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, शनिवारपासून ६ दिवस बँका बंद, कारण काय?

यानंतर आरोपींनी त्याला वारंवार अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. पुढील काही आठवड्यांत त्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर १० लाख आणि ११ लाख रुपये असे मोठे व्यवहार केले. अशा प्रकारे एकूण २१.५ लाख रुपये त्याने ट्रान्सफर केले. डॅशबोर्डवर त्याला तब्बल ६९ लाख रुपयांचा नफा दिसत होता, मात्र प्रत्यक्षात तो पूर्णपणे बनावट होता.

MUMBAI BUMBLE SCAM: INTERIOR DESIGNER LOSES ₹21.5 LAKH IN FAKE FOREX INVESTMENT FRAUD
Shocking : नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, मावशीच्या मुलासोबत रिलेशनमध्ये आली; बॉयफ्रेंडने असं काही केलं की महिला हादरून गेली

जेव्हा त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी ३० टक्के अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची अट घातली. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने त्याला संशय आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर क्राईम हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली. या प्रकरणी सेंट्रल रिजन सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बँक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित सोशल मीडिया प्रोफाइल्सचा माग काढण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com