धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाचा औंढा नागनाथमधील भक्त निवासात आढळला मृतदेह, पोलीस दलात खळबळ

PSI Found Dead at Aundha Nagnath Bhakta Niwas: हिंगोली पोलीस विभागातील एक पोलीस उपनिरीक्षकाचा भक्त निवासमध्ये मृतदेह आढळला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे.
PSI  Found Dead at Aundha Nagnath Bhakta Niwas:
POLICE SUB INSPECTOR FOUND DEAD IN AUNDHA NAGNATH BHAKTA NIWASsaam tv
Published On
Summary
  • औंढा नागनाथमध्ये PSI चा मृतदेह आढळला

  • पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम मृत्यू प्रकरण

  • हिंगोली पोलीस दलातील धक्कादायक घटना

संदीप नागरे, साम प्रतिनिधी

हिंगोली पोलीस दलातील एक धक्कादायक घटना घडली आहे. औंढा नागनाथ शहरातील मंदिर संस्थांच्या भक्त निवासस्थानात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळला आहे. ज्ञानेश्वर कदम, असं पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते औंढा नागनाथ शहर पोलीस स्टेशनमध्ये 11 महिन्यापासून कार्यरत होते. दरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

PSI  Found Dead at Aundha Nagnath Bhakta Niwas:
Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम हे औंढा मंदिर परिसरात गेल्या काही महिन्यापासून कर्तव्यदेखील बजावत असल्याची माहिती औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी दिली आहे. पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर कदम यांना एका रोगाने देखील ग्रासले होते अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

PSI  Found Dead at Aundha Nagnath Bhakta Niwas:
बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण; पाच जणांकडून जीवघेणा हल्ला

काल सायंकाळी औंढा नागनाथ मंदिर संस्थांच्या भक्त निवासातील एका रुममधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी याची माहिती औंढा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. कर्तव्य बजावून विश्रांतीसाठी कदम हे भक्त निवासात गेले असावेत आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज औंढा नागनाथ पोलिसांनी व्यक्त केला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

PSI  Found Dead at Aundha Nagnath Bhakta Niwas:
Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

ज्ञानेश्वर कदम यांच्या मृतदेहावर औंढा नागनाथ उपजिल्हा रुग्णालयात शबविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या मृतदेहावर त्यांचे मूळ गाव असलेल्या रांजाळा येथे शासकीय इन तमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम यांच्या कुटुंबात दोन मुली पत्नी एक मुलगा नातवंड असा परिवार असून या घटनेमुळे संपूर्ण कदम कुटुंब शोक सागरात बुडाले आहे, हिंगोली चे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी देखील या घटनेनंतर दुःखद सहवेदना व्यक्त केल्या असून दिवंगत पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर कदम यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com