Pravin Tarde-Deool Band 2 : स्वामींचे तेजस्वी रूप पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध; 'देऊळ बंद २' सुसाट, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची ५ व्या दिवशी कमाई किती?

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 5 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटातून स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांचे जीवन अधोरेखित केले आहे. कलेक्शन जाणून घेऊयात.
Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 5
Pravin Tarde-Deool Band 2saam tv
Published On
Summary

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

'देऊळ बंद २' चित्रपटाची १५ कोटींपार कमाई

'देऊळ बंद २' मधून स्वामी भक्तीचा अनुभव

प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. 'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. त्याच्या उत्साहाचे आणि अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पाच दिवसांत किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारी १,८०३ शोजमधून ₹३.४० कोटींचे नेट कमाई केली आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर गाजत आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, संवाद, कालाकारांचा अभिनय यामुळे चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. प्रवीण तरडेंही देखील चार दिवसांच्या कलेक्शनची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

'देऊळ बंद २' चार दिवसांचे कलेक्शन

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • एकूण - १७. ४७ कोटी रुपये

'देऊळ बंद' चित्रपट

'देऊळ बंद २' हा २०१५ साली रिलीज झालेल्या 'देऊळ बंद'चा सीक्वल आहे. 'देऊळ बंद' मध्ये मराठी अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. तसेच या चित्रपटात प्रवीण तरडे, मोहन जोशी, गिरिजा जोशी, स्नेहल तरडे, सुनील अभ्यंकर, मोहन आगाशे, शर्वरी जमेनिस , महेश मांजरेकर आणि सुनील बर्वे असे अनेक कलाकार झळकले होते. या चित्रपटाची कथा डॉ. राघव शास्त्री या एका अहंकारी आणि नास्तिक 'नासा' (NASA) शास्त्रज्ञाभोवती गुंफलेली आहे.

'देऊळ बंद २' चित्रपटात महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसल्या आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. त्यासोबतच चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 5
Renuka Shahane Photos : २५ वर्षांची अनोखी प्रेम काहाणी! रेणुका शहाणे अन् आशुतोष राणा पुन्हा अडकलं लग्नबंधनात; अभिनेता म्हणाला- "आनंदाने भरलेला काळ"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com