Deool Band 2 Collection : प्रेक्षक 'स्वामी' भक्तीत तल्लीन! 'देऊळ बंद २'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची चौथ्या दिवशी तगडी कमाई

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 4 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत १० कोटींचा गल्ला जमावला आहे.
Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 4
Deool Band 2 Collectionsaam tv
Published On
Summary

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

'देऊळ बंद २' चित्रपटाची १० कोटींपार कमाई

'देऊळ बंद २' मध्ये गश्मीर महाजनीची झलक पाहायला मिळाली.

शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित 'देऊळ बंद २' चित्रपट रिलीज होऊन ४ दिवस झाले आहेत. प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला गुरुवारी थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमाला महाराष्ट्रातून भरपूर प्रेम मिळत आहे. या चित्रपटात शेतकरी महिला देवाची परीक्षा घेताना दिसत आहे.

'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे आहे, कारण आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश देणारा आहे. वीकेंडला चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

'देऊळ बंद २' चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.११ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ५.२१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ज्यामुळे 'देऊळ बंद २' ची तीन दिवसांची एकूण कमाई ११.३७ कोटी रुपये झाली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २' चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी ५.९० कोटी रुपयांची कमाई केली. 'देऊळ बंद २'ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ५.९० कोटी रुपये

'देऊळ बंद २' बजेट किती?

सोशल मीडियावर आणि वेबसाईट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट ९ ते १० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. यामुळे चित्रपटाने आपले बजेट आधीच वसूल केले आहे. 'देऊळ बंद २' चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी केले आहे.

'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसली आहे. तसेच चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 4
Kangana Ranaut-Aishwarya Rai : "ती तुम्हाला खुश करण्यासाठी इथे आलेली नाही..."; ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना कंगना रणौत यांचं सडेतोड उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com