Deool Band 3 : स्वामी थेट अमेरिकेत पोहचणार, राघव शास्त्रीला भेटणार अन्...; 'देऊळ बंद ३' ची कथा काय? प्रवीण तरडेंनी दिली हिंट

Pravin Tarde - Deool Band 3 Storyline : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 3' ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या कथेसंबंधित मोठे अपडेट, जाणून घेऊयात.
Pravin Tarde - Deool Band 3 Storyline
Deool Band 3 SAAM TV
Published On
Summary

'देऊळ बंद २'नंतर 'देऊळ बंद 3' येणार

अमेरिकेत राघव शास्त्रीला स्वामी फोन करतात

स्वामी थेट अमेरिकेला जाणार

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला गुरुवारी रिलीज झाला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री स्नेहल तरडेने शेतकरी महिलेची भूमिका साकारली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २'ची आतापर्यंत भारतातील एकूण ग्रॉस कमाई 57.63 कोटी आणि एकूण नेट कमाईने 49.00 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठेल. अशात 'देऊळ बंद' चे चाहते 'देऊळ बंद ३' चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात नेमकं काय असेल, कोणते कलाकार झळकणार, कथा काय असेल, विषय नेमका कोणता याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 'देऊळ बंद ३' च्या कथेविषयीचे काही अपडेट जाणून घेऊयात.

'देऊळ बंद 3' ची कथा काय असणार?

२०१५ मध्ये रिलीज झालेल्या 'देऊळ बंद' ची कथा सायंटिस्ट राघव शास्त्रीच्या भोवती फिरली. त्यानंतर २०२६ मध्ये रिलीज झालेल्या 'देऊळ बंद २' ची कथा शेतकरी महिलेवर आधारित आहे. आता तिसऱ्या भागात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या भागात स्वामी थेट अमेरिकेला पोहचणार आहेत आणि तेथील एका नास्तिकाला वळणार घेऊन येणार आहे. स्वामींची भक्ती एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. 'देऊळ बंद' ची कथा राघव शास्त्री आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. 'देऊळ बंद २' ची कथा शेतकऱ्यांवर आधारित आहे. तर 'देऊळ बंद 3' ची कथा आपल्या देशाशी संबंधित आहे. म्हणून चित्रपटाचे नाव 'देऊळ बंद ३-आत्मनिर्भर भारत' असे ठेवण्यात आले आहे.

'देऊळ बंद' मध्ये मराठी अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. 'देऊळ बंद २'च्या शेवटी गश्मीर महाजनी म्हणजेच राघव शास्त्रीची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळते. शेवटच्या सीनमध्ये पाहायला मिळते की, राघव शास्त्री अमेरिकेत आपल्या कंपनीत असताना त्याला स्वामींचा फोन येतो. स्वामी त्याला म्हणतात, "मी अक्कलकोटहून स्वामी समर्थ बोलतोय, तुला मी आठवतोय का? India@11 " हे ऐकताच राघव शास्त्रीला मोठा धक्का बसतो. राघव शास्त्री म्हणतो, "ओह माय गॉड" त्यावर स्वामी म्हणतात, "येस माय डार्लिंग, आय एम युअर गॉडच... काय म्हणतेय तुझी अमेरिका? काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प?" त्यावर राघव म्हणतो, "आज 10 वर्षांनी माझी कशी काय आठवण झाली?" त्यावर स्वामी म्हणतात, "तुझ्या सारख्या एका नास्तिकाला मार्गी लावून आलोय. तुझ्या मनातील नास्तिकता कमी नाही झाली?" त्यावर राघव शास्त्री म्हणतो, "तुम्हाला माझ्या मनात किती अस्तिकता आहे हे पाहण्यासाठी अमेरिकेत यावंच लागेल महाराज..." हे बोलताच स्क्रीनवर 'देऊळ बंद ३' ची घोषणा होते. लिहिलेले दिसते की, 'देऊळ बंद ३-आत्मनिर्भर भारत'

प्रवीण तरडेंनी सांगितल्यानुसार, 'देऊळ बंद' चे एकूण ११ भाग येणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे आहे. तसेच आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश देणे हा आहे. 'देऊळ बंद -2' चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.

Pravin Tarde - Deool Band 3 Storyline
Famous Actress : "मी अजून मेलेली नाही..."; जिवंत असूनही प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफवा, स्वतः VIDEO शेअर करून केला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com