Manasvi Choudhary
सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा नुकताच 'देऊळ बंद 2' हा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज झाला आहे.
या चित्रपटात प्रवीण तरडे याच्यासह पत्नी म्हणजेच स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत दिसत आहे.
चित्रपटात स्नेहल तरडे ही गावातील शेतकऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तिने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.
चित्रपटाच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यत प्रेक्षकांना उत्तमरित्या खिळवून ठेवण्याचे काम स्नेहल तरडे यांनी केलं आहे.
स्नेहल ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याआधीही तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.
सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, देऊळ बंद - भाग १, व्हेंटिलेटर या सिनेमांमध्ये स्नेहलने काम केले आहे.
स्नेहल तरडे या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. त्या अनेकदा प्रवीण तरडेंसोबतचे कौटुंबिक फोटो आणि आगामी चित्रपटांचे अपडेट्स शेअर करत असतात.
ग्लॅमरस दुनियेत राहूनही स्नेहल तरडे यांचे साधेपण आणि त्यांचा 'मराठमोळा लूक' चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो.