Manasvi Choudhary
केस लांब, मोठे असावेत अशी प्रत्येक महिला व मुलीची इच्छा असते. केस वाढण्यासाठी महिला व मुली केसांवर उपाय करतात.
बाजारातील महागडे शॅम्पू किंवा हेअर ट्रीटमेंट्समुळे केसांची गुणवत्ता खराब होते यासाठी आज आम्ही तुम्हाला केस वाढण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहेत.
कांदा केसांसाठी फायदेशीर आहे. कांद्यातील सल्फरमुळे केसांची वाढ होते. केसांना कांद्याचा तेल लावणे फायद्याचे आहे.
दर ३ ते ४ महिन्यांनी केसांचे टोक हलके ट्रिम करा. यामुळे दुभंगलेले केस निघून जातात आणि केसांची वाढ चांगली होते.
केसांना कोणतेही केमिकलयुक्त प्रोडक्ट लावू नका. हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा हेअर कलरचा वापर कमीत कमी करा.
रोज रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे बोटांच्या टोकांनी टाळूवर गोलाकार मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
केस धुतल्यानंतर ओले असताना विंचरणे टाळा यामुळे केस गळती होणार नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.