Famous Actress : "मी अजून मेलेली नाही..."; जिवंत असूनही प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफवा, स्वतः VIDEO शेअर करून केला मोठा खुलासा

Famous Actress Death Rumours : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सोशल मीडियावर मृत्यूच्या अफवा पसरल्या आहेत. तिने स्वतः व्हिडिओ शेअर करत सर्व अफवांचे खंडन केले आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Famous Actress Death Rumours
Famous ActressSAAM TV
Published On
Summary

सोशल मीडियावर पसरल्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफवा

अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत सर्व अफवांचे खंडन केले

अभिनेत्रीने दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवर तीव्र संताप व्यक्त केला

मनोरंजन विश्वात खळबळजनक घटना घडताना दिसत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यू्च्या अफवा पसरल्या आहेत. मात्र अखेर मल्याळम अभिनेत्री ज्युवेल मेरी (Jewel Mary) हिने सोशल मीडियावर फिरणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. कर्करोगामुळे अभिनेत्रीचा आवाज गेला असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, तसेच तिच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे असत्य असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केले. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे, अभिनेत्रीने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली असून ती आता पूर्णपणे निरोगी आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या अंत्यसंस्कारांची पत्रकेही मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आली होती. ज्युवेल मेरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत ती ट्रेडमिलवर व्यायाम करताना दिसत आहे. अभिनेत्री व्हिडीओत म्हणाली की, "गेल्या दोन दिवसांत माझ्या निदर्शनास आलेली एक गोष्ट मला स्पष्ट करायची होती. मंडळी, मी अजून मेलेले नाही! काही लोक अशा बातम्या पसरवत आहेत की माझा आवाज गेला आहे, मी अंथरुणाला खिळून पडले आहे आणि मृत्यूची वाट पाहत आहे, इतकेच नव्हे तर मला धड हालचालही करता येत नाही. पण मी पूर्णपणे जिवंत आहे..."

अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे, ऑनलाइनवर शेअर केली जाणारी ही माहिती अलीकडची नाही, तर ती तिच्या आयुष्यातील अशा एका टप्प्याशी संबंधित आहे, ज्यावर तिने यापूर्वीच यशस्वीरित्या मात केली आहे. ती म्हणाली, "२०२३ मध्ये, मला झालेल्या कर्करोगाबद्दल मी सार्वजनिकरित्या भाष्य केले होते. आता काही ऑनलाइन वापरकर्त्यांनी ती जुनी विधाने उचलली आहेत आणि दिशाभूल करणाऱ्या मथळ्यांसह ती शेअर करत आहेत; ज्यामुळे असे भासविले जात आहे की मी आजही त्याच अवस्थेत आहे..."

अभिनेत्रीने व्हिडीओत असेही नमूद केले की, या बातम्या वाचल्यानंतर अभिनेत्रीच्या कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चाहते घाबरले आणि त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. या अफवांमुळे जवळच्या लोकांमध्ये काळजी आणि अस्वस्थता निर्माण झाली. २०२३ मध्ये ज्युवेल मेरीला थायरॉईड कर्करोगाचे निदान झाले होते. वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर ती पूर्णपणे बरी झाली.ज्युवेल मेरी ही अभिनेत्रीसोबतच उत्तम टीव्ही निवेदिका देखील आहे.

Famous Actress Death Rumours
Deool Band 2 Collection : स्वामींची कृपा! 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू; 'राजा शिवाजी'ला देतोय तगडी टक्कर, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाने किती कमावले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com