Sakshi Sunil Jadhav
टिटवी हा सतर्क पक्षी असतो. परिसरात काही हालचाल, प्राणींची येणं किंवा धोका जाणवला की ती मोठ्या आवाजात ओरडते.
टिटवी झाडावर नव्हे तर जमिनीवर अंडी घालते. त्यामुळे आपल्या घरट्याजवळ कोणी आले तर ती सतत आवाज करून इशारा देते.
धोका मोठा वाटल्यावर अनेक टिटव्या एकत्र येऊन आवाज करतात. हा त्यांचा संरक्षणाचा नैसर्गिक उपाय आहे.
याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. टिटवीचा आवाज हा केवळ संरक्षणात्मक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
पूर्वी ग्रामीण भागात रात्री शांतता असायची. अशावेळी टिटवीचा तीव्र आवाज भयावह वाटायचा आणि त्याला अपशकुनाशी जोडले गेले.
पक्ष्यांना वातावरणातील बदल, हालचाल किंवा आवाज लवकर कळतो. मात्र ते ‘मृत्यू’ ओळखतात, असा कोणताही ठोस संशोधन निष्कर्ष नाही.
काही प्राणी-पक्षी नैसर्गिक आपत्तीपूर्वी अस्वस्थ होतात, असे निरीक्षण आहे. पण टिटवी विशेषतः मृत्यूचा संकेत देते, असा पुरावा नाही.
भारतीय परंपरेत ज्येष्ठांकडून आलेल्या अनेक समजुती अनुभवांवर आधारित आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.