Sonali Kulkarni : "हे खूप भयंकर..."; पुण्याकडे जाताना सोनाली कुलकर्णी तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकली, संताप व्यक्त करत VIDEO शेअर

Sonali Kulkarni Video : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकली. तिने व्हिडीओ शेअर करून संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.
Sonali Kulkarni Video
Sonali Kulkarnisaam tv
Published On
Summary

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 5 तास वाहतूक कोंडीत अडकली.

अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करून संताप व्यक्त केला.

मानखुर्द मार्गे पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

सध्या वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. रोजच्या प्रवासात १-२ तास तर ट्राफिकमध्येच जातात. अशात आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनाली कुलकर्णी काल तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकली होती. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वाहतूक कोंडी, ट्रॅफिक लोकांचे हाल पाहायला मिळत आहेत. तिने या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ट्राफिक कंट्रोलरूमशी संपर्क साधला.

सोनाली कुलकर्णीने व्हिडीओ शेअर करून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. "हे खूप भयंकर आहे... कृपया वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मदत करा अशी विनंती तिने केली..." तसेच तिने या व्हिडीओला कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं की, "5 तास झाले...अजूनही रस्त्यात त्याच ठिकाणी आहे. नक्की काय चाललंय? काय झालंय..." रात्री 11च्या सुमारास इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर केला.

मानखुर्द मार्गे पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी आणि इतर कलाकार मंडळी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडेने देखील या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, "मी सुद्धा अडकले...स्वतःची काळजी घे."

सोनाली कुलकर्णी वर्कफ्रंट

सोनाली कुलकर्णीने आजवर अनेक हिट हिंदी, मराठी चित्रपट केले आहेत.सोनाली कुलकर्णीचे दिल चाहता हैं, गुलाबजाम हे चित्रपट खूप हिट झाले. तसेच ती 'मानवत मर्डर्स' या थ्रिलर सीरिजमधून झळकली. सोनाली कुलकर्णीला आपल्या कला क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Sonali Kulkarni Video
Abhishek Bachchan : अभिषेकने खोटी अंगठी घालून केलं होत ऐश्वर्या रायला प्रपोज, बच्चन कुटुंबाच्या लेकावर 'अशी' वेळ का आली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com