Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai Pune traffic update today : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai Pune Expressway latest traffic update : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Expressway) खंडाळा घाटात आज मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. खंडाळा घाटात सुरू असलेल्या 'मिसिंग लिंक'च्या (Missing Link Project) कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करताना शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा. अथवा वाहतूक कोंडीची स्थिती पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही कोंडी अधिक प्रमाणात आहे. रस्ता रुंदीकरण आणि पुलाच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर पुलाला कलरिंगचे काम चालू होते. त्याचा परिणाम सध्या मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खंडाळा घाटात वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com