Mirzapur Starcast: अब भी मजा आ रहा है; 'मिर्झापूर' फेम कालिन भैयासोबत ऑनस्क्रीन बायकोची खास पोस्ट

Rasika Dugal Post For Mirzapur Starcast: 'मिर्झापूर' फेम अभिनेत्री रसिका दुगल नेहमी चर्चेत असते. रसिकाने नुकताच पंकज त्रिपाठीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. तिने मिर्झापूरच्या पहिल्या सीझनचा ट्रेलर लाँचचा फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Mirzapur Starcast: अब भी मजा आ रहा है; 'मिर्झापूर' फेम कालिन भैयासोबत ऑनस्क्रीन बायकोची खास पोस्ट
Rasika Dugal PostSaam TV

मिर्झापूर ही सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरीजपैकी एक आहे. मिर्झापूर वेबसीरीज ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसीरीज ठरली आहे. पंकज त्रिपाठी, रसिका दुगल यांनी या वेबसीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.या वेबसीरीजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसीरीजच्या रिलीजआधी आता रसिक दुगलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Mirzapur Starcast: अब भी मजा आ रहा है; 'मिर्झापूर' फेम कालिन भैयासोबत ऑनस्क्रीन बायकोची खास पोस्ट
Dharmaveer 2 : CM एकनाथ शिंदे 'धर्मवीर २' चित्रपटात झळकणार? चर्चांना उधाण

रसिका दुगलने 'मिर्झापूर'मधील सर्व कास्टसोबत फोटो शेअर केले आहेत. जेव्हा मिर्झापूरचा पहिला सीझन आला होता तेव्हाचा फोटो आणि आताचा फोटो असे फोटो तिने पोस्ट केले आहे. रसिक दुगलने पंकज त्रिपाठीसोबतचा २०१८ मधील फोटो शेअर केला आहे तर त्याच्या बाजूला २०२४ मधील फोटो शेअर केला आहे.याचसोबत रसिका दुगलने मिर्झापूरच्या पहिल्या सीझनचा ट्रेलर लाँचचा फोटो आणि आताचा ट्रेलर लाँचचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोवर रसिका दुगलने हटके कॅप्शन दिले आहे. सुरुवातीला पण मज्जा केली होती, अन् आतापण मज्जा येत आहे.यातील पहिला फोटो हा २०१८ मधील मिर्झापूर वेबसीरीज ट्रेलर लाँचचा आहे तर दुसरा फोटो २०२४ मधील ट्रेलर लाँचचा आहे. प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारसाठी तयार आहात ना?,असं कॅप्शन तिने या फोटोवर दिले आहे.

Mirzapur Starcast: अब भी मजा आ रहा है; 'मिर्झापूर' फेम कालिन भैयासोबत ऑनस्क्रीन बायकोची खास पोस्ट
Disha Patani: टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा करतेय 'या' सुपरस्टारला डेट? टॅटूमुळे चर्चांना उधाण

रसिकाने या फोटोंमध्ये सर्व स्टारकास्टचे फोटो शेअर केले आहेत. त्याचसोबत मिर्झापूर वेबसीरीजच्या दिग्दर्शकांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंनी मिर्झापूरच्या संपूर्ण टीमच्या जून्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Mirzapur Starcast: अब भी मजा आ रहा है; 'मिर्झापूर' फेम कालिन भैयासोबत ऑनस्क्रीन बायकोची खास पोस्ट
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Photos: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल गेले हनिमूनला; रोमँटिक फोटो केले शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com